Solapur Vande Bharat Express : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. अशातच सोलापूरकरांसाठी अजून एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. दक्षिण रेल्वे विभाग लवकरच सोलापूर मार्गे अजून एक वंदे भारत एक्सप्रेस चालवणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे सोलापूर वासियांना मोठा फायदा होणार असल्याची बतावणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण रेल्वे विभागाने गेल्या आठवड्यात सिकंदराबाद-पुणे वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन सोलापूर मार्गे जाणार आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर आणि आता सिकंदराबाद पुणे या वंदे भारत एक्सप्रेस चा लाभ देखील सोलापूर वासियांना होणार आहे.
दरम्यान या नुकत्याच दक्षिण रेल्वेच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेल्या रेल्वे भारत ट्रेनमुळे हैदराबाद आणि पुणे दरम्यानचा प्रवास सोलापूर वासियांसाठी सोयीचा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सिकंदराबाद पुणे त्यासोबतच सिकंदराबाद तिरुपती आणि सिकंदराबाद बेंगलोर या तीन वंदे भारत ट्रेनची नुकतीच घोषणा झाली आहे.
यामुळे आता या वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान यांच्या तारखा देखील लवकरच जाहीर होणार आहेत. दक्षिण रेल्वे विभागाकडून या तीन वंदे भारत एक्सप्रेस लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी तयारी जोमात सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकंदरीत सिकंदराबाद पुणे वंदे भारत सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पाठोपाठ या नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा देखील सोलापूरकरांना फायदा होणार आहे. आपल्या माहितीसाठी सांगायचं झाल तर, सध्या पुणे ते हैदराबादसाठी शताब्दी एक्सप्रेस ही ट्रेन सुरू आहे. यासह इतरही अनेक एक्सप्रेस ट्रेन या रूटवर अविरतपणे आपल्या सेवा देत आहेत.
मात्र संपूर्णपणे स्वदेशी बनावटीने तयार करण्यात आलेली वंदे भारत ट्रेन ही आरामदायी आणि वेगवान आहे. शिवाय या गाडीमध्ये असं तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे ज्यामुळे या गाडीचा अपघात होण्यापासून संरक्षण लाभते. या गाडीत कवच नावाच तंत्रज्ञान विकसित करण्यात आल आहे त्यामुळे एका ट्रॅकवर जर दोन गाड्या असतील तर या ट्रेनला तीन किलोमीटर पूर्वीचं समजतं आणि ऑटोमॅटिक या ट्रेनचे ब्रेक लागले जातात.
म्हणजे समोरासमोर ट्रेनची धडक होत नाही. विशेष बाब अशी की हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वंदे भारत ट्रेन अतिशय फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. मात्र या ट्रेनचे भाडे इतर ट्रेनच्या तुलनेत काहीसे अधिक आहे. दरम्यान जर आपणास मुंबई सोलापूर ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी किती तिकीट द्यावे लागेल याची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपण खाली दिलेल्या लिंक वर जाऊन याची सखोल माहिती जाणून घेऊ शकता.
वंदे भारत एक्सप्रेस : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकिटाचे दर झालेत जाहीर