Solapur Osmanabad Railway : सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग बाबत एक महत्त्वाचे आणि अतिशय कामाचं असं अपडेट हाती आल आहे. हा रेल्वेमार्ग सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
या रेल्वे मार्गमुळे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. आता या रेल्वे मार्गबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, हा रेल्वेमार्ग वसंत विहारच्या बाजूने जाणार आहे. जवळपास बाराशे मीटरचा सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग वसंत विहारच्या बाजूने प्रस्तावित आहे.
पण या ठिकाणी या रेल्वे मार्गाचे भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम अपूर्ण आहे. परंतु लवकरच सिटी सर्व्हे विभागाकडून मोजणीचे काम सुरू केले जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र या रेल्वे मार्गाबाबत एक दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. ती म्हणजे सोलापुरातील नऊपैकी सात गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. साहजिकच यामुळे या कामाला गती लाभणार आहे.
विशेष म्हणजे या गावांच्या सर्व्हेबाबत रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यामध्ये बाळे, भोगाव, बाणेगाव, मार्डी, वनसळ, सेवालाल नगर तसेच उत्तर सोलापूर या भागातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. या गावातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी करावी लागणार होती. जी की आता पूर्ण झाली आहे. यामुळे साहजिकच रेल्वे मार्गाच्या कामाला मोठी गती लाभणार आहे.
या सर्व्हेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आराखडा तयार झाल्यानंतर जिल्हा भूसंपादन विभागाकडे तसेच रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आराखडा सादर करू, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र सिटी सर्व्हे परिसरात येणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील काही भागाचा आणि खेड गावाचा संयुक्त सर्व्हे बाकी असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.