Solapur Farmer News : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे आव्हाने समोर येत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय हा तोट्याचा व्यवसाय सिद्ध होऊ लागला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि आता रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली याही महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच आहे.
यामुळे रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांचे नुकसान झाले असून फळबाग पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हानी झाली आहे. यामुळे शेतकरी राजा अक्षरशः बेजार झाला आहे. या अस्मानी संकटांपायी शेतकऱ्यांना शेती व्यवसाय हा परवडेनासा झाला आहे. अस्मानी संकटांचा कहर तर सुरूच आहे शिवाय बाजारात शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांची कायमच दुहेरी कोंडी होत असते.
या संकटातून देखील मात्र बळीराजा मार्ग काढतो म्हणजे काढतो. म्हणूनच कदाचित शेतकऱ्यांना राजाची पदवी देण्यात आली असावी. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील या संकटातून मार्ग शोधला आहे. सोलापूर जिल्ह्यात असा एक नवीन प्रयोग समोर आला आहे ज्या प्रयोगाने शेतकऱ्यांना एकरी दहा लाख रुपयांची कमाई मिळवून दिली आहे.
जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्याच्या मंद्रूप या गावातील अमोगसिद्ध कुंभार आणि बसवराज कुंभार या शेतकऱ्यांनी ही किमया साधली आहे. कुंभार यांनी लिंबूच्या शेतीतून एकरी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. यामुळे त्यांची सध्या पंचक्रोशीत जोमात चर्चा सुरु आहे. या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एका एकरात 250 कागदी लिंबूची लागवड केली.
हे पण वाचा :- मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! ‘हा’ पूल 11 एप्रिलपासून ‘इतके’ दिवस राहणार बंद, प्रवाशांची होणार गैरसोय
या कागदी लिंबूला बाजारात मोठी मागणी असल्याने या पिकातून त्यांना आता चांगली कमाई होणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंबूची एक बॅग तब्बल दहा हजार रुपये प्रमाणे विक्री होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की लिंबूची शेती ही सर्व प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. तथापि याची लागवड जुलै ते ऑगस्ट या काळात करणे अतिशय उपयुक्त ठरते.
कागदी लिंबू, गोड लिंबू तसेच बारामासी या काही लिंबू च्या प्रमुख जाती आहेत. लिंबू ची लागवड ही 5.5 ते 6.5 पीएच म्हणजेच सामु असलेल्या जमिनीत करणे उपयुक्त ठरते. निश्चितच कोणत्याही जमिनीत याची लागवड करता येत असल्याने शेतकऱ्यांसाठी लिंबूची शेती फायदेशीर ठरू शकते. सोलापूर जिल्ह्यातील या प्रयोगशील शेतकऱ्यांनी हे सिद्ध देखील करून दाखवले आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता पुण्याचा प्रवास होणार सुसाट; ‘या’ अति महत्त्वाच्या प्रकल्पाला एमएमआरडीएची मंजुरी, पहा….