Small Business Idea : स्वतःचा बिजनेस असावा असे स्वप्न अनेकजण पाहतात. पण अनेकांना कोणता बिजनेस सुरु करावा? याबाबत काहीच सुचत नाही. दरम्यान जर तुमचाही असाच विचार असेल, तुम्हीही नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
सामान्यतः लोकांना असे वाटते की, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसे लागतात. पण, आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमी पैसे गुंतवून अगदीच कमी दिवसात चांगला नफा मिळवू शकता.
आम्ही ज्या बिजनेसबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पेपर नॅपकिन म्हणजेच टिश्यू पेपर बनवण्याचा व्यवसाय. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे हे विशेष. पेपर नॅपकिन्स बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करून तुम्ही बंपर उत्पन्न मिळवू शकता.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी सामान्यतः टिश्यू पेपरचा वापर केला जातो. आजकाल ते रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ढाबे, ऑफिसेस, हॉस्पिटल्स अशा जवळपास सर्वत्र वापरले जाते.
म्हणून या बिजनेसमधून चांगली कमाई करता येणे शक्य होणार आहे. आता आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमकी किती गुंतवणूक करावी लागते आणि या व्यवसायातून किती कमाई होऊ शकते या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
या बिझनेस साठी किती गुंतवणूक करावी लागते?
जर तुम्हाला पेपर नॅपकिन म्हणजेच टिश्यू पेपरचे उत्पादन युनिट उभारायचे असेल तर तुम्हाला सुमारे 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. इतके पैसे मिळाल्यानंतर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही बँकेतून अर्ज करू शकता.
तुमच्याकडे 3.50 लाख रुपये असल्याने, तुम्हाला बँकेकडून अंदाजे 3.10 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 5.30 लाख रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज मिळेल. अशा तऱ्हेने तुम्ही हा व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकता. महत्वाचे म्हणजे यामधून होणारी कमाई ही देखील अफाट आहे.
टिश्यू पेपर व्यवसायातून किती कमाई होणार?
एका वर्षात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिन्स तयार होऊ शकतात. ते सुमारे 65 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकले जाऊ शकते. म्हणजेच तुम्ही एका वर्षात सुमारे 97.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता. सर्व खर्च काढला तर वर्षाला 10-12 लाख रुपये वाचू शकतात.
तुमचे नॅपकिन्स विकण्यासाठी तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीशीही करार करू शकता. अशा प्रकारे, खर्च वगळल्यानंतर, तुम्ही एका महिन्यात 1 लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळवू शकता. याद्वारे तुम्ही हळूहळू संपूर्ण कर्जाची परतफेड करू शकता.