Small Business Idea : तुम्हालाही कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःची कंपनी सुरू करायची आहे ? हो, मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचा. अलीकडे नवयुवक तरुण, तरुणी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करू इच्छित आहेत. खरंतर, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आता सुरक्षितता राहिलेली नाही.
कंपनी केव्हा निरोप देईल हे सांगता येत नाही, हेच कारण आहे की, प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे स्वप्न अनेकांनी उराशी बाळगले आहे. जर तुमचेही असेच स्वप्न असेल पण कोणता व्यवसाय करावा हे सुचत नसेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक भन्नाट बिझनेस प्लॅन घेऊन हजर झालो आहोत.
विशेष म्हणजे आज आम्ही ज्या बिजनेसबाबत माहिती देणार आहोत तो व्यवसाय फक्त आणि फक्त 25,000 रुपयात सुरू होऊ शकतो. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बिझनेस आयडिया विषयी सविस्तर माहिती.
कोणता आहे तो बिजनेस ?
आम्ही ज्या बिजनेस बाबत बोलत आहोत तो आहे सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय. तुम्ही सिक्युरिटी एजन्सीची कंपनी सुरू करून चांगली कमाई करू शकणार आहात. या व्यवसायासाठी तुम्हाला जास्तीची गुंतवणूक देखील करावी लागणार नाही. मात्र यातून मिळणारा नफा हा खूपच अधिक राहणार आहे. वास्तविक, कोणतीही कंपनी सुरू करायची असली तर तिथे सेक्युरिटी गार्ड लागतोच.
त्यामुळे सिक्युरिटी एजन्सीचा हा व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. या व्यवसायात मंदी येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. सेक्युरिटी गार्ड कंपनीच्या सुरक्षेसाठी, श्रीमंतांच्या सुरक्षासाठी आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असतात. यामुळे सिक्युरिटी एजन्सी सुरू करून अशा लोकांना तुम्ही सिक्युरिटी गार्ड पुरवू शकता आणि यातून चांगली कमाई तुम्हाला होणार आहे.
कसा सुरु करणार व्यवसाय ?
सेक्युरिटी एजन्सीचा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कंपनी तयार करावी लागणार आहे. या बिझनेससाठी तुम्हाला काही आवश्यक लायसन्स देखील घ्यावे लागतील. या भन्नाट बिजनेससाठी तुम्हाला ईएसआयसी आणि पीएफ नोंदणी करावी लागणार आहे.
जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे. यासोबतच कामगार न्यायालयात कंपनीची नोंदणी करणेही आवश्यक आहे. हा असा व्यवसाय आहे जो तुम्ही पैसे आणि जागेची चिंता न करता सुरू करू शकता. हा बिजनेस पार्टनरशिप मध्ये ही सुरू होऊ शकतो.
सेक्युरिटी एजन्सीसाठी परवाना कुठून मिळवायचा ?
खाजगी सुरक्षा एजन्सी नियमन कायदा 2005 अंतर्गत सुरक्षा एजन्सी उघडण्याचा परवाना जारी केला जातो. त्याला PSARA म्हणतात. या परवान्याशिवाय खासगी सुरक्षा एजन्सी चालवता येत नाही. यासाठी परवाना देण्यापूर्वी अर्जदाराची पोलिस पडताळणी केली जाते.
एजन्सी उघडण्यासाठी, सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्य नियंत्रण प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या संस्थेशी करार करावा लागतो. हा परवाना काढण्यासाठी काही शुल्क देखील भरावे लागते.
जर एकाच जिल्ह्यातील सेक्युरिटी एजन्सीसाठी लायसन्स हवे असेल तर 5000 रुपये, 5 जिल्ह्यातील सिक्युरिटी एजन्सीसाठी लायसन्स हव असेल तर दहा हजार आणि एका राज्यासाठी जर सिक्युरिटी एजन्सी लायसन्स हवे असेल तर 25 हजार रुपये एवढं शुल्क लागणार आहे.