Small Business Idea : तुम्हीही अतिरिक्त कमाईसाठी व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात ? मग आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. 2020 पासून असे आढळून आले आहे की, सुशिक्षित तरुण-तरुणी आता छोटासा का होईना पण स्वतःचा व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत.
यामुळे देशात गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन स्टार्टअप सुरु झाले आहेत. जर तुम्हीही एखादा व्यवसाय करू इच्छित असाल मात्र तुमच्याकडे अपेक्षित भांडवल नसेल तर आज आम्ही तुम्हाला कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत. आज आपण ज्या बिझनेसची माहिती पाहणार आहोत तो अवघा 60 हजार रुपयात सुरू होणारा व्यवसाय आहे.
कोणता आहे तो व्यवसाय
अलीकडे प्रत्येकाकडे मोबाईल फोन आला आहे. भारतात आता 5g नेटवर्क आले असल्याने प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनचा वापर हा आगामी काळात आणखी वाढणार आहे. स्मार्टफोन हे महागडे असतात यामुळे याच्या सुरक्षेसाठी अनेक जण कव्हर वापरतात.
कव्हर वापरल्याने स्मार्टफोन सुरक्षित राहतो. यामुळे मोबाईल कव्हरचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या संधीचे सोने करू शकतात आणि मोबाईल कव्हर प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. अलीकडे मोबाईल कव्हर फक्त सुरक्षेसाठी नव्हे तर मोबाईल स्टायलिश दिसायला पाहिजे यासाठी देखील वापरले जातात.
यामुळे बाजारात वेगवेगळ्या डिझाईनच्या मोबाईल कव्हरची मागणी असते. या परिस्थितीत जर तुम्ही स्टायलिश मोबाईल कव्हर प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला यातून चांगली कमाई होणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला वेगवेगळ्या डिजाईनचे कव्हर तयार करावे लागणार आहेत आणि याच्या विक्रीसाठी योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी मशीन लागणार
मोबाईल कव्हर प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर आणि प्रिंटिंग मशीन लागणार आहे. हे मशीन तुम्हाला बाजारात सहजतेने उपलब्ध होईल. तुम्ही हा बिझनेस एक छोटासा गाळा भाडेतत्त्वावर घेऊन सुद्धा सुरू करू शकता. किंवा जर तुमचे घर मार्केटमध्येच असेल तर घरातूनच हा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
तथापि हा व्यवसाय अशा ठिकाणी सुरू करावा जिथे मोबाईल दुकान व इतर इलेक्ट्रिकचे दुकान असतात. अशा ठिकाणी मोबाईल कव्हर प्रिंटिंग शॉप ओपन केल्यास चांगली कमाई होणार आहे.
जर तुम्ही छोटे मशीन खरेदी केले तर या मशीनचा वापर करून तुम्ही दिवसाला चार ते पाच मोबाईल कव्हर प्रिंट करू शकता. यासाठी तुम्हाला कम्प्युटर मशीन तसेच रॉ मटेरियल म्हणून कलर आणि चांगल्या क्वालिटीचे बॅक कव्हर (ज्यावर तुम्हाला प्रिंट करायचे आहे) खरेदी करावे लागणार आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार
या व्यवसायासाठी तुम्हाला किमान 60 ते 70 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकते. जर गाळ्यासाठी डिपॉझिट द्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला अधिकचा पैसा खर्च करावा लागेल. मोबाईलचे बॅक कव्हर प्रिंट करण्यासाठी जवळपास दहा मिनिटे लागतात. हे प्रिंट केलेले बॅक कव्हर तुम्ही दीडशे ते दोनशे रुपयांना विकू शकता.
मात्र तुम्हाला सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेले प्रॉडक्ट बनवावे लागणार आहेत. तुम्ही ऑफलाइन तर तुमचे प्रॉडक्ट विकू शकता शिवाय ऑनलाइन देखील या प्रॉडक्टची विक्री करू शकता. ऑनलाइन प्रॉडक्टची विक्री केल्यास तुम्हाला अतिरिक्त नफा मिळणार आहे.