Small Business Idea : अलीकडे तरुण वर्ग नोकरी ऐवजी छोटासा का होईना पण स्वतःचा उद्योग असायला हवा असे स्वप्न पाहत आहे. दरम्यान, आजची ही बातमी ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर, नोकरींत अलीकडे शाश्वती राहिलेली नाही. अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नाराज दिलेला आहे.
यामुळे अनेक जण नोकरी सोडून आता उद्योग, व्यवसायात उतरत आहेत. तसेच काहीजण नोकरी सोबतच अतिरिक्त कमाई साठी स्वतःचा व्यवसाय करत आहेत. जर तुम्ही ही नवीन व्यवसाय करू इच्छित असाल आणि कोणता व्यवसाय करावा हेच सुचत नसेल तर आगामी तुम्हाला एका भन्नाट बिजनेसची माहिती देणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला नारळ पाणी व्यवसायाबाबत माहिती देणार आहोत. नारळ पाण्याच्या व्यवसायातून चांगली कमाई करता येणार आहे. नारळ पाणी हे मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते.
याच्या सेवनाने शरीर तंदुरुस्त राहते. यामध्ये असणाऱ्या औषधी घटक पाहता डॉक्टर देखील नारळ पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यामुळे नारळ पाणी व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला यातून चांगली कमाई होऊ शकणार आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी जागा किंवा गाळा भाड्याने घ्यावा लागणार आहे. जर तुम्ही जागा भाड्याने घेतली तर तुम्ही फूड कार्ड बनवून हा व्यवसाय चालू शकता. गाळा असेल तर तुम्ही गाळ्यात नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करू शकता.
अलीकडे अनेक जण थेट बाजारातून नारळ आणून पिण्यापेक्षा दुकानातून नारळ पाणी पितात. यासाठी तुम्हाला नारळ मधून पाणी काढून ते पेपर कप मध्ये पॅक करावे लागेल.
किंवा तुम्ही पेपर कप मध्ये नारळ पाणी पॅक करून ठेवण्याऐवजी जेव्हा ग्राहक तुमच्या दुकानावर येईल त्यावेळी नारळ मधून पाणी काढून त्यांना पेपर कप मध्ये देऊ शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त भांडवल गुंतवावे लागत नाही. फक्त सुरुवातीला नारळ खरेदी करण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे.
पण, तुम्हाला दुकानात ग्राहकांना बसता यावे यासाठी चेअर्स आणि टेबल ठेवावे लागणार आहे. खुर्च्या आणि टेबल ठेवल्यात म्हणजेच ग्राहक तुमच्या दुकानावर जास्त वेळ थांबेल. ग्राहकाची गर्दी पाहून इतरही ग्राहक तुमच्या दुकानाकडे अट्रॅक्ट होतील.
किती कमाई होणार ?
जर तुम्ही तुमच्या दुकानात चांगली सर्विस दिली आणि स्वच्छता ठेवली तर ग्राहक तुम्हाला नारळ पाण्यासाठी चांगले पैसे देतील. रस्त्याच्या किनाऱ्यावर किंवा लोटगाडीवर जे नारळ 60 ते 70 रुपयाला मिळते ते नारळ पाणी तुमच्या दुकानावर तुम्ही शंभर रुपयांपर्यंत देखील विकू शकता. यासाठी मात्र तुम्हाला पॉश एरियामध्ये तुमचं शॉप ओपन करावे लागणार आहे.
तसेच तुम्हाला तुमच्या दुकानात चांगली सर्विस द्यावी लागणार आहे. जर तुम्हाला अधिक कस्टमर यावे असे वाटत असेल तर 60 ते 70 रुपयाला नारळ विकत आणून देणार तुम्ही 80 ते 90 रुपयाला ग्राहकांना विकू शकता. जर तुमचा सेल चांगला झाला तर या व्यवसायातून तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकणार आहे.