Small Business Idea : तुम्हाला तुमचा स्वतःचा बिजनेस सुरू करायचा असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. खरे तर, अनेकांना नोकरी सोबतच स्वतःचा व्यवसाय करायचा असतो अशा लोकांसाठी देखील आज आम्ही महत्त्वाची माहिती देणार आहोत. आज आपण 60000 रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू होणाऱ्या एका भन्नाट बिजनेसची मस्त आयडिया पाहणार आहोत. कोरोना महामारीच्या काळापासून आपल्या देशात बिजनेसचा ट्रेंड वाढू लागला आहे.
प्रामुख्याने आपल्या राज्यात आता नवयुवक तरुण बिजनेस कडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहत आहेत ही खरे तर आनंदाची गोष्ट आहे. बिजनेस म्हणजे गुजराती लोकांची मक्तेदारी, आपण मराठी माणसांनी बिजनेस करायचाच नाही असा समज आपल्या लोकांमध्ये फार पूर्वीपासून पद्धतशीरपणे रोवला गेला आहे.
मात्र आता हा समज पुसण्याचे काम नवयुवक तरुण करत आहेत. अनेक मराठी उद्योजकांनी आपल्या स्वतःच्या कर्तुत्वावर अन जिद्दीवर व्यवसाय क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी केलेली आहे. दरम्यान आज आपण नजीकच्या काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत.
कोणता आहे हा व्यवसाय
आजच्या युगाला कम्प्युटर युग, मोबाईल युग असं म्हटलं जातं. लवकरच याला एआय युग असेही म्हटले जाईल. कारण की आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोन विना कोणतेही काम करणे अशक्य झाले आहे. यामुळे साहजिकच मोबाईल फोनची मागणी वाढली आहे. यासोबतच या रिलेटेड अनेक व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात नोटा छापताय.
असाच एक व्यवसाय म्हणजे मोबाईल कव्हरचा. या व्यवसायातून व्यावसायिकांनी चांगला बक्कळ पैसा कमावला आहे. पण आता साधे मोबाईल कव्हर कोणीच वापरत नाही. प्रिंटेड किंवा कस्टमाईझ्ड मोबाईल कव्हर वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोबाईल सुरक्षितही राहिला पाहिजे अन स्टायलिश पण दिसला पाहिजे असे प्रत्येकालाच वाटते.
यामुळे तुम्ही या संधीचे सोने करू शकता. तुम्ही प्रिंटेड मोबाईल कव्हर बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. विशेष म्हणजे यासाठी फारसा पैसा लावावा लागत नाही हे या व्यवसायाचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. हा व्यवसाय फक्त 60000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो.
कसा सुरु करणार हा व्यवसाय?
जर तुम्ही शहरात राहत असाल आणि बाजारपेठेच्या आसपास तुमचे घर असेल तर तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून देखील सुरू करू शकता. कारण की या व्यवसायासाठी फारशी जागा लागत नाही. मात्र जर तुम्ही गावात राहत असाल आणि तुमच्या जवळच्या शहरात तुम्हाला असा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला तिथे एक शॉप भाडेतत्त्वावर घ्यावे लागणार आहे, त्यामध्ये थोडेसे फर्निचर करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व्यवसायाचा सेटअप करू शकता. यासाठी तुम्हाला एक लॅपटॉप किंवा कम्प्युटर लागणार आहे.
तसेच तुम्हाला मोबाईल कव्हर प्रिंट करण्यासाठी मशीन परचेस करावे लागणार आहे. या मशीनच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजतेने बॅक कव्हर प्रिंट करू शकता. यासोबतच तुम्हाला प्रिंट करण्यासाठी कलर, प्लास्टिक अशा वेगवेगळ्या गोष्टी लागणार आहेत. या साऱ्या गोष्टी तुम्हाला 60 ते 65 हजार रुपयांपर्यंत सहज मिळून जातील. एकंदरीत हा संपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये इन्वेस्ट करावे लागू शकतात. यामध्ये आपण शॉप चे भाडे आणि इलेक्ट्रिसिटी बिल इत्यादी कव्हर करू शकतो.
किती कमाई होणार
या मोबाईल कव्हर प्रिंटर मशीनच्या माध्यमातून दहा मिनिटात एक कव्हर प्रिंट केले जाऊ शकते. या व्यवसायात तुम्हाला चांगला मार्जिन मिळणार आहे. मात्र तुम्हाला असे बॅक कव्हर तयार करावे लागतील जे की बाजारात ट्रेडिंगला आहेत. हे बॅक कव्हर तुम्ही ऑफलाइन मार्केटमध्ये तर विकणारच आहात शिवाय तुम्हाला हे ऑनलाईन मार्केटमध्ये देखील विकता येणार आहेत.
अमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो इत्यादी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या वस्तू सहजतेने विकू शकता. योग्य पद्धतीने मार्केटिंग केल्यास, प्रिंटेड कव्हरची कॉलिटी चांगली ठेवल्यास, ट्रेंडिंग डिझाइन्स प्रिंट केल्यास तुम्हाला नक्कीच या व्यवसायातून चांगली कमाई होऊ शकणार आहे.