Small Business Idea : तुम्हीही नवीन व्यवसाय करण्याच्या तयारीत आहात का ? पण कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाहीये, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण अशा एका व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत जो व्यवसाय तुम्हाला तुमच्या घरातूनच सुरू करता येऊ शकणार आहे.
विशेष म्हणजे हा बिजनेस बारा महिने चालणारा राहणार आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो मात्र नंतर तुम्हाला यातून चांगली कमाई होणार आहे. चला तर मग मिळण्याचा आवडता जाणून घेऊया या बिजनेस आयडिया विषयी सविस्तर.
कोणता आहे तो व्यवसाय
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत व्यवसाय आहे मुरमुरा मेकिंग बिजनेस. मुरमुऱ्याला बाजारात नेहमीच मागणी असते. हॉटेल इंडस्ट्री पासून ते भारतीय स्वयंपाक घरात सर्वत्र मुरमुऱ्याला मागणी असते.
मुंबईमध्ये भेळपुरी मध्ये मुरमुऱ्याचा वापर होतो. याचा वापर प्रसादासाठीही केला जातो. मुरमुरा देवालाही अर्पण केला जातो. याचा अर्थ मुरमुऱ्याला मोठी बाजारपेठ आहे. यामुळे मुरमुरा मेकिंग बिजनेस हा निश्चितच प्रॉफिट मेकिंग बिझनेस ठरणार आहे.
किती खर्च करावा लागेल
या व्यवसायासाठी जवळपास चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या एका अहवालानुसार हा संपूर्ण मुरमुरा मेकिंग बिझनेस चा प्लांट उभा करण्यासाठी तीन लाख 55 हजार रुपयांचा खर्च करावा लागू शकतो.
विशेष म्हणजे जर एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्याच्याकडे भांडवल नसेल तर तो पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकणार आहे.
मुरमुरा बनवण्यासाठी तांदळाचा रॉ मटेरियल म्हणून वापर होतो. तुम्हाला तांदूळ बाजारपेठांमध्ये सहजतेने उपलब्ध होईल किंवा तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करू शकता आणि हा व्यवसाय सुरू करू शकता.
तुम्हाला लायसेन्स पण काढावे लागेल
या व्यवसायासाठी तुम्हाला एफएसएसएआय चे लायसन्स देखील काढावे लागणार आहे. याशिवाय तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन देखील पूर्ण करावे लागणार आहे. तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन देखील करावे लागेल.
किती कमाई होणार ?
मुरमुरा बनवण्यासाठी दहा ते वीस रुपये प्रति किलो एवढा खर्च येऊ शकतो. मात्र तुम्ही मुरमुरे 40 ते 45 रुपये प्रति किलो या घरात थेट रिटेलमध्ये म्हणजेच किरकोळ बाजारात विक्री करू शकता.
अशा तऱ्हेने जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करून तुमचे उत्पादन थेट रिटेलमध्ये विक्री केले तर या व्यवसायातून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते.