Sleeper Vande Bharat Train : गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेसची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ही ट्रेन सुरू होऊन जवळपास पाच-सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सर्वप्रथम 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात झाली होती.
ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू करण्यात आली. मात्र सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. म्हणजेच देशात 41 महत्त्वाच्या अप आणि डाऊन मार्गांवर 82 वंदे भारत गाड्या चालू आहेत.
विशेष बाब म्हणजे येत्या काही महिन्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
खरे तर वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या हाय स्पीड ट्रेनला रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून विशेष पसंती दाखवली जात आहे.
त्यामुळे विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. रेल्वे देखील वेगवेगळ्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे.
या गाडीची वाढती लोकप्रियता पाहता आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला मिळणार आहे.
या गाडीची सुरुवात एप्रिल 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसने आता झोपून प्रवास करता येणार आहे.
विशेष म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्री देखील चालवल्या जातील, या गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन्ही प्रकारचे कोच राहणार आहेत. या गाडीमध्ये 16 ते 20 कोच राहणार आहे.
मार्च 2024 पर्यंत 10 स्लीपर वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन पूर्ण होईल असा अंदाज आहे. सुरुवातीला या गाडीची मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते हावडा या मार्गांवर सेवा सुरू होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे या मार्गावर एप्रिल 2024 मध्ये या स्लीपर ट्रेनची सेवा सुरू होऊ शकते अशी आशा व्यक्त होत आहे. यामुळे लवकरच मुंबई ते दिल्ली हा प्रवास गतिमान होणार आहे.