Skymet Navin Havaman Andaj 2024 : गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या मान्सून मध्ये महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. याचा परिणाम म्हणून उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीबाणीची परिस्थिती तयार झाली असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये कमी पावसामुळे अगदी पिण्याच्या पाण्याचे देखील हाल होत आहेत. यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय. शेतकरी बांधव मान्सून 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तसेच यावर्षी मान्सून काळात पाऊसमान कसे राहणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या मान्सून बाबतच्या पहिल्या अंदाजाकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अशातच आता स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने मान्सून 2024 संदर्भातला आपला नवीन सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे. खरेतर स्कायमेटने गेल्या महिन्यात देखील मानसून बाबतचा अंदाज जाहीर केला होता.
आता पुन्हा एकदा त्यांनी मान्सून 2024 संदर्भातील आपला नवीन सुधारित हवामान अंदाज दिला आहे. पहिल्या हवामान अंदाजात या संस्थेने यावर्षी देशात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली होती. यामुळे आता या सुधारित हवामान अंदाजात स्कायमेटने काय म्हटले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
काय म्हणतंय स्कायमेंट ?
स्कायमेटने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार यावर्षी मान्सून काळात भारतात समाधानकारक पाऊस पाहायला मिळणार आहे. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगले राहणार आहे. यावर्षी सरासरीच्या 102% एवढ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात एलनिनोचे सावट राहणार नाही. एल निनोचे रूपांतर ला निनामध्ये होणार आहे. यामुळे राज्याच्या अवर्षणग्रस्त म्हणजेच कमी पाऊस पडणाऱ्या भागातही चांगल्या पर्जन्यमानाची शक्यता तयार होत आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निनासाठी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे. परिणामी यंदाच्या मान्सून कालावधीतला पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला राहू शकतो, असे यां संस्थेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यावर्षी मान्सून आपल्या देशात वेळेत दाखल होणार आहे.
तसेच जर प्रशांत महासागरात तापमान उच्च राहिले तर चक्रीवादळ आणि अतिवृष्टीची शक्यता देखील आहे. एकंदरीत यावर्षी मान्सून सामान्य राहणार असे स्कायमेटने आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे.
यामुळे स्कायमेट या संस्थेचा हा अंदाज खरा ठरला पाहिजे असे बोलले जात आहे. जर स्कायमेंटचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यंदा चांगली कमाई होईल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.