Skymet Havaman Andaj : गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या समवेतच विविध पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली.
पिक उत्पादनात आलेल्या घटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत 2024 चा पावसाळा कसा राहणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अशातच आता जगातील अनेक नामांकित संस्थांनी 2024 च्या पावसाळ्याबाबत प्राथमिक अंदाज देण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील हवामान संस्थेने अर्थातच नोआ या संस्थेने येत्या दोन महिन्यात प्रशांत महासागरातील एलनिनोचा प्रभाव ओसरणार असल्याचे सांगितले.
तसेच देशातील काही हवामान तज्ञांनी एलनिनोचा प्रभाव ओसरल्यानंतर यंदा भारतात समाधानकारक पाऊस होईल अशी आशा देखील व्यक्त केली आहे.
अशातच आता देशातील हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था स्कायमेटने देखील आगामी पावसाळ्याबाबत पहिला प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
2024 मध्ये पावसाळा कसा राहणार याबाबत स्कायमेटने मोठी माहिती दिली आहे. स्कायमेटने म्हटल्याप्रमाणे, यंदा देशात एल निनो सक्रीय राहण्याची शक्यता खूपच धुसर आहे.
म्हणजे सध्याच्या परिस्थितीनुसार एल निनो यंदाच्या पावसाळी काळात सक्रिय राहणार नाही. याचा परिणाम म्हणून देशभरात चांगला पाऊस चांगला पडू शकतो.
निश्चितच अमेरिकेच्या हवामान संस्थेने आणि स्कायमेट या देशातील हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी हवामान संस्थेने वर्तवलेला प्राथमिक अंदाज जर खरा ठरला तर देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी राहणार आहे.
तथापि स्कायमेट या संस्थेने एप्रिलमध्ये 2024 च्या पावसाळ्याबाबतचा सविस्तर अंदाज दिला जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभाग देखील एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला हवामान अंदाज जारी करत असते.
यामुळे यंदाच्या पावसाळ्याबाबत योग्य ती स्पष्टोक्ती येण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पहावी लागणार आहे. पण, सध्याची परिस्थिती ही यंदाच्या मान्सून काळात चांगला पाऊस होईल असे चित्र तयार करत आहे.