Sindhudurg Kolhapur Highway : सिंधुदुर्ग ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता सिंधुदुर्ग ते कोल्हापूर दरम्यान प्रवासासाठी 166 जी या राष्ट्रीय महामार्गाचा अवलंब प्रवासी करत असतात.
या राष्ट्रीय महामार्गाचा वापर हा साखर कारखानदारीं व पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. याच रस्त्याबाबत आता एक मोठ अपडेट हाती आल आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची उपलब्धता झाली आहे.
खरं पाहता सध्या स्थितीला हा सिंगल रस्ता आहे आणि आता या रस्त्याचे दुपदरीकरण केलं जाणार आहे. यासाठी 249 कोटीचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे 21 किलोमीटर लांबीचे काम होणार आहे.
या रस्त्यावर जो करूळ घाट आहे त्या ठिकाणी सातत्याने मोठा पाऊस पडत असतो. यामुळे घाटमाथ्यावरील डांबरीकरणाचा रस्ता खराब होतो. हे काही पहिल्यांदाच होत आहे असं नाही तर वारंवार याची पुनरावृत्ती होत असते. परिणामी आता यावर शाश्वत तोडगा काढण्यासाठी सदर रस्ता हा काँक्रिटीचा बनवला जाणार आहे.
या रस्त्यावर एकूण 21 किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरणाचे काम होणार आहे. यामध्ये घाटमाध्यामध्ये दहा किलोमीटर लांबीचा आणि सात मीटर रुंदीचा रस्ता बनवला जाईल. उर्वरीत 11 किमी लांबीमध्ये काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी रस्ता + पेव्हड शोर्ल्डर्स असा एकूण 10 मीटर रुंदीने काँक्रिटचा रस्ता तयार होणार आहे.
यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरं पाहता महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यां राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आणि काँक्रिटीकरणासाठी वारंवार पाठपुरावा केला जात होता. यासाठी रस्ते व परिवहन मंत्रालय यांना शासनाकडून वारंवार पत्र लिहिले जात होते.
अखेरकार सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून रस्त्यावरील 21 किलोमीटर लांबीच्या दुपदरी काँक्रिटीकरण रस्त्यासाठी 249 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे या रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास येईल आणि येथील साखर कारखानदारांची वाहतूक आणि पर्यटन दृष्ट्या केली जाणारे वाहतूक अजूनच सुरळीत होईल यात तीळ मात्र देखील शंका नाही.