Sinchan Vihir Anudan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी सुद्धा अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत म्हणजे नरेगाअंतर्गत सिंचन विहिरीसाठी अनुदान दिले जात आहे. खरे तर, ही योजना फार आधीपासूनच लागू आहे.
मात्र आता यामध्ये सरकारने काही महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचे बदल केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आधी या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, सरकारने गेल्या महिन्यात या योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 ऑगस्ट 2024 ला याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी आता पाच लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच अनुदानाच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या नवीन निर्णयानुसार 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अकोला जिल्ह्यातील तीन हजार 135 लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच या पात्र शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बांधकाम विभागाच्या चालू दरसुचीनुसार आणि केंद्र शासनामार्फत १ एप्रिल २०२४ पासून ‘नरेगा ‘ अंतर्गत लागू करण्यात आलेले प्रतिदिवस २९७ रुपये मजुरीचे दर विचारात घेता सिंचन विहीरीसाठीच्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
याबाबतचा निर्णय राज्य शासनाने 5 ऑगस्ट 2024 ला निर्गमित केला आहे. राज्य शासनाच्या ५ ऑगस्ट रोजीच्या निर्णयानुसार, सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाची रक्कम पाच लाख रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यानुसार एक एप्रिल 2024 नंतर मंजूर झालेल्या अकोला जिल्ह्यातील 3,135 लाभार्थी शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. आता आपण जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थी संख्या जाणून घेणार आहोत.
तालुकानिहाय लाभार्थी संख्या
अकोला ११२, अकोट १३३, बाळापूर २८१, बार्शिटाकळी १२९९, मूर्तिजापूर ४८६, पातूर ६०७ अन तेल्हारा २१७