shirdi mumbai samruddhi mahamarg : सध्या राज्यात रस्ते विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज झाले आहे. पुढल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकासाच्या कामांना गती दिली जात आहे. अशातच आता समृद्धी महामार्ग म्हणजेच राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा संदर्भात एक मोठी अपडेट आमच्या हाती आली आहे.
वास्तविक मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे म्हणजे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा गेल्यावर्षी प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल करण्यात आला. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे त्यावेळी याचे उद्घाटन करण्यात आले. हा पहिला टप्पा 520 किलोमीटर लांबीचा असून यामुळे नागपूरहुन शिर्डीचा प्रवास समृद्धी महामार्गाने शक्य होत आहे.
हे पण वाचा :- आता राजधानी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार वंदे भारत ट्रेन ?
यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचत आहे. सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मात्र पाच तासांचा कालावधी लागत आहे. दरम्यान या महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई याचे देखील काम जलद गतीने सुरू आहे. या कामासंदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील शिर्डी ते इगतपुरी हे काम पूर्ण झाले आहे.
मार्गाचे हे अंतर 85 किलोमीटरचे असून आता हा टप्पा सर्वसामान्यांसाठी शासनाच्या मान्यतेनंतर खुला केला जाणार आहे. जर या 85 किलोमीटरच्या मार्गाला शासनाने प्रवाशांसाठी खुला करण्याची मान्यता दिली तर मुंबई वासियांना शिर्डीकडे प्रवास करताना सोयीचे होणार असून यामुळे त्यांचा जवळपास दोन तासांचा कालावधी वाचणार आहे. सध्या स्थितीला समृद्धी महामार्ग कोकमठाण पर्यंत सुरू आहे.
पण आता पाथरे ते कोकमठाण हे 11 किलोमीटरचे रखडलेले काम, तसेच सोनांबे (ता. सिन्नर) ते भरवीर (ता. इगतपुरी) हे 25 किलोमीटरचे अपूर्ण काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे कोकमठाण ते भरवीर अर्थातच शिर्डी ते इगतपुरी हा 85 किलोमीटरचा टप्पा आता वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना लवकरच मिळणार मोठ गिफ्ट! ‘या’ मार्गांवर तयार होणार सर्वाधिक लांबीचा डबल डेकर रस्ता, ट्रॅफिकची कायमची कटकट मिटणार
हा टप्पा जर खुला झाला तर मुंबईहुन शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना भरवीर येथून समृद्धीवर एन्ट्री मिळणार आहे. यामुळे नासिक जाण्याचे त्यांना काही कारण राहणार नाही, परिणामी त्यांचा दोन तासांचा वेळ वाचण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक मधील प्रवाशांना देखील समृद्धी महामार्गावर इंट्री घेण्यासाठी आता कोकमठाणला जाण्याची गरज नाही आता नासिक मधील प्रवासी एक तर भरवीर किंवा गोंदे या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावर जाऊ शकणार आहेत.
तूर्तास शिर्डी ते इगतपुरी हा टप्पा सुरू करायचे की नाही याबाबत शासनाकडून आदेश आलेले नाहीत मात्र लवकरच हा टप्पा सुरू होणार आहे. तसेच संपूर्ण समृद्धी महामार्ग म्हणजेच मुंबई ते नागपूर हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि याच वर्षी हा महामार्ग सामान्य जनतेच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्यातील सर्व महिलांना अर्ध्या तिकिटावर एसटीचा प्रवासाची योजना; ‘या’ महिन्यापासून होणार लागू, पहा डिटेल्स