Shimla Mirchi Lagvad:- सध्या कृषी क्षेत्रामधील पारंपारिक शेती पद्धत आणि पारंपारिक पिकांची लागवड काळाच्या ओघात मागे पडत असून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत भाजीपाला पिके तसेच फळबागा व फुल पिके इत्यादींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत.
तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यामध्ये यश मिळताना आपल्याला दिसून येत आहे. जर आपण तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणून जर शेडनेट कडे पाहिले तर ती काही गुंठा क्षेत्रामध्ये दर्जेदार असे भरघोस भाजीपाला पिकांचे उत्पादन मिळवणे आता शक्य झालेले आहे.
तसेच कमीत कमी पाण्याचा वापर शेतकरी आता ही किमया साध्य करू लागली आहेत. शेडनेट मधील भाजीपाला पिकांचे येणारे भरघोस उत्पादनाच्या बाबतीत जर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शेतकऱ्यांचा विचार केला तर या शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड करून अवघ्या तीनच महिन्यांमध्ये तब्बल साडेचार लाखांचे उत्पन्न घेण्यात यश मिळवले आहे.
शेडनेटमध्ये तीन महिन्यात घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेडनेटसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत मालेगाव तालुक्यातील मोरदर येथील शेतकरी निंबाजी ठाकरे यांनी दहा एकर क्षेत्रामध्ये विविध प्रकारची पिके घेतलेली आहेत.
यामध्ये त्यांनी काही क्षेत्रावर शेडनेटची उभारणी करून त्यामध्ये अडीच महिन्यात अगोदर शिमला मिरचीची लागवड केली असून त्यातून आता उत्पादन मिळायला लागलेली आहे. शिमला मिरचीची लागवड करून 55 दिवसात त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाली व 55 दिवसात त्यांना पहिला तोडा मिळाला
व यातून जवळपास 40 टन शिमला मिरचीचे उत्पादन मिळाले. एवढेच नाही तर आतापर्यंत तीन महिन्यांमध्ये त्यांना तब्बल साडेचार लाखांचे आर्थिक उत्पन्न शिमला मिरचीतून मिळाले आहे.
तसेच अजून 40 टन उत्पादन निघेल अशी अपेक्षा त्यांना आहे. निंबाजी ठाकरे यांनी पाण्याचे देखील व्यवस्थित नियोजन केले व या मिरचीला पाण्याचे नियोजन करण्याकरिता त्यांनी फॉगर ड्रीपच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन केले व उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली.