Shilai Machine Anudan Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. महिलांसाठी देखील केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक कौतुकास्पद योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
अशातच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील महिलांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील महिलांना पंचायत समितीच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
धुळे पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-2025 या आर्थिक वर्षांत पंचायत समितीच्या सेस फंडाच्या 20 टक्के अनुदानातून मागासवर्गीय घटकांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
यामुळे नक्कीच जिल्ह्यातील महिलांना या योजनेमुळे मोठा फायदा होणार आहे. महिलांच्या हाताला यामुळे रोजगार मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे शिवण मशिन अर्थातच शिलाई मशीन हे इलेक्ट्रॉनिक मोटारवाले राहणार आहे.
यासाठी इच्छुक आणि पात्र महिलांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र महिलांना 25 सप्टेंबर, 2024 पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत.
म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या धुळे जिल्ह्यातील महिलांना अर्ज सादर करण्यासाठी फक्त आणि फक्त पाच दिवसांचा काळ मिळणार आहे. यामुळे जर तुम्ही हे धुळे जिल्ह्यातील असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला आजच या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे इच्छुक आणि पात्र महिलांकडून या योजनेसाठी ताबडतोब अर्ज सादर करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये याची माहिती सार्वजनिक केले असून अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेसाठी एससी अर्थातच अनुसूचित जाती, एसटी अर्थातच अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, भटक्या विमुक्त जमाती या संवर्गातील लाभार्थी पात्र राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या अर्जदारांना या योजनेसाठी अर्ज सादर करावयाचा असेल त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभेच्या ठरावानुसार विहित नमून्यातील अर्ज अटी व शर्तीच्या अधिन राहून 25 सप्टेंबर, 2024 पर्यंत पंचायत समिती, धुळे येथे सादर करायचे आहेत.
नक्कीच शंभर टक्के अनुदानावर महिलांना शिलाई मशीन उपलब्ध होणार असल्याने याचा जिल्ह्यातील पात्र आणि संबंधित प्रवर्गातील महिलांना मोठा फायदा होणार आहे.