shettale anudan yojana : कोरोना काळात शेतकरी हिताच्या अनेक योजना स्थगित करण्यात आल्या होत्यां. यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मागेल त्याला शेततळे योजना यांचा समावेश होता. दरम्यान आता या दोन्ही योजना पूर्ववत झाल्या असून मागेल त्याला शेततळे योजना ही नव्या रुपात आणि नव्या ढंगात सरकारने सुरू केले आहे.
विशेष म्हणजे मागेल त्याला शेततळे योजनेत अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात देखील वाढ झाली आहे. खरं पाहता, गेल्या ठाकरे सरकारने मागेल त्याला शेततळे अनुदान योजना बंद केली होती. त्यावेळी या योजनेअंतर्गत 50 हजाराच अनुदान मिळत होतं.
मात्र आता वैयक्तिक शेततळे योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत राबवली जात आहे. आता वैयक्तिक शेततळे साठी लाभार्थी शेतकऱ्यांना वाढीव अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत 75 हजाराच अनुदान मिळत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत दिल जाणार हे अनुदान केवळ अस्तरीकरणासाठी प्रोव्हाइड केलं जातं. दरम्यान या अनुदानासाठी शासनाने अर्ज मागवले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधीक्षक यांनी देखील शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यासाठी या आर्थिक वर्षात 390 शेततळ्यांचा लक्षांक मिळाला आहे. या शेततळ्यांसाठी आकारमानानुसार 14,433 ते 75000 पर्यंतचा अनुदान मिळण्याचे प्रावधान आहे. जिल्हा कृषी अधिकारी महेश तीर्थकर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?
या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अनुदान प्राप्त करणे हेतू संबंधित अर्जदार शेतकऱ्याकडे 0.60 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
सदर जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी.
सदर अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी शेततळ्यासाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दस्ताऐवज
अर्जदार शेतकऱ्याचा सातबारा उतारा व 8 अ उतारा
अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
बँक पासबुक झेरॉक्स
हमीपत्र
जातीचा दाखला
अर्ज कुठे करावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड करण्यात आल्यानंतर शेतकरी बांधवांना शेततळे अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक तीर्थकर यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.