Shetkari Karjmafi Yojana : शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी भांडवलाची गरज असते. मात्र शेतातून मिळणारे कवडीमोल उत्पन्न यामुळे अनेकदा शेतकऱ्यांकडे भांडवल उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांना बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. बँका देखील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देतात.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देखील शेतकऱ्यांना अल्प दरात दीर्घ मुदतीच कर्ज दिल जात. विहीर खोदण्यासाठी, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी, पाईपलाईन इत्यादी बाबींसाठी या बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळत. मात्र दोन रुपयाच्या अर्जावर भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळत.
विशेष म्हणजे अवघ्या सत्तर रुपयात कर्जाचा बोजा हा सातबारावर लावला जात असे. निश्चितच भूविकास बँकेकडून अल्प दरात जास्त मुदतीच कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळत होता. मात्र बँकेने वाटप केलेले कर्ज वेळेत वसूल न होऊ शकल्याने या बँकेची आर्थिक कोंडी झाली.
विशेष म्हणजे शासनाने देखील बँकेला हमी दिली नाही. यामुळे भूविकास बँक डबघाईला आली. यामुळे बँकेने कर्जाचा वाटप बंद केलं. आणि शेतकऱ्यांकडून केवळ कर्जाची वसुली सुरू ठेवली. मात्र, भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेपासून देखील वंचित ठेवण्यात आले.
परिणामी कर्जदार शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतच राहिला. कर्जमाफी योजने पासून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांनाही इतरांप्रमाणे कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत होती. अशा परिस्थितीत शासनाकडे ही बाब विचारत होती. या अनुषंगाने नोव्हेंबर 2022 मध्ये शासनाकडून भूविकास बँकेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नोव्हेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रातील एकूण 34 हजार शेतकऱ्यांवर भूविकास बँकेचे 964 कोटी 15 लाख रुपये कर्ज होते. यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने नोव्हेंबरमध्ये भूविकास बँकेतील या 34,000 शेतकऱ्यांचे 964 कोटी 15 लाख रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला. आता याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
मार्च अखेरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. निश्चितच यंदाच्या मार्च अखेर भूविकास बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार असून थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार निल होणार आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील 4115 शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनेचा फायदा लाभणार आहे. या शेतकऱ्यांचे एकूण 128 कोटी 50 लाखचे कर्ज माफ होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये 38 कोटी 94 लाख ही मुद्दल आणि उर्वरित रक्कम ही व्याज आहे.
साहजिकच मुद्दल पेक्षा व्याज अधिक आहे. मात्र कर्जमाफीचा निर्णय झाला असल्याने कुठे ना कुठे या शेतकऱ्यांची सातबारे निल होतील आणि त्यांना दिलासा मिळेल असं मत व्यक्त केलं जात आहे.