Sheep Farming : भारतातील बहुतांश भागात शेती व्यवसायाच्या (Farming) अगदी सुरुवातीपासून पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जात आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीसोबतच अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळवण्यासाठी गाय, म्हैस, शेळी, उंट यांसारखे प्राणी दुग्धव्यवसायासाठी पाळत असतात.
मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्या देशात मेंढीपालन देखील मोठ्या प्रमाणात केले जाते. आपल्या राज्यातही मेंढीपालन बहुसंख्य शेतकरी करत आहेत. मेंढीपालनामुळे दूध तसेच लोकर मिळते. यामुळे या व्यवसायातुन (Agriculture Business) दुहेरी शेतकऱ्यांना होत असल्याचा दावा केला जातो. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते अत्यंत कमी खर्चात मेंढीपालन सुरू करू शकतात. त्याचबरोबर दूध, लोकर, चामडे, खत यापासून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
मेंढ्यांच्या प्रजाती तरी नेमक्या कोणत्या
भारतातील बहुतांश भागात मेंढीपालन फार पूर्वीपासून केले जात आहे. यामध्ये आपल्या राज्याचा देखील समावेश आहे. मेंढीपालन सुरू करण्यासाठी, फक्त सुधारित मेंढ्यांच्या प्रजाती निवडणे आवश्यक आहे, ज्यातून दूध आणि लोकर चांगल्या प्रमाणात मिळू शकेल. मालपुरा, जैसलमेरी, मांडिया, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कोरीडियालरा माबुटू, छोटा नागपुरी आणि शाहाबाद इत्यादी भारतातील मेंढ्यांच्या प्रजातीं शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
मेंढी पालन नेमकं कसं सुरु करणार
जाणकार लोक शेतकरी बांधवांना सल्ला देतात की, मेंढीपालनातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. जाणकार लोकांनी या व्यवसायाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मेंढ्यांच्या अन्नाबद्दल सांगायचे तर ते शाकाहारी प्राणी आहेत, जे हिरवा चारा आणि पाने खातात. आणि त्यांचा कचरा शेतात पोषक खत म्हणून वापरला जातो. वेळोवेळी मेंढ्या चरण्यासाठी आणि कळपांमध्ये फिरण्यासाठी न्याव्या लागतात. सामान्यत: मेंढ्यांचे आयुष्य केवळ 7-8 वर्षे असते, परंतु त्यांच्या आयुष्यात भरपूर लोकर तयार करून ते शेतकरी आणि पशुपालकांना करोडपती बनवतात.
खर्च आणि मिळणार उत्पन्न
तज्ञ लोकांच्या मते, मेंढी हा शाकाहारी प्राणी आहे, ज्याची देखभाल करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. जनावरांची खरेदी आणि उभारणीसाठी फक्त एक वेळ खर्च होतो. 15-20 मेंढ्यांपासून पशुपालन सुरू करायचे असेल, तर जातीनुसार एक मेंढी 3000-8000 रुपयांना मिळते. त्याचवेळी 20 मेंढ्यांच्या खरेदीवर सुमारे 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च होतात. तज्ञांच्या मते, 20 मेंढ्यांसाठी 500 चौरस फुटाचा तबेला पुरेसा आहे, जो 30,000-40,000 रुपये खर्चून तयार केला जाऊ शकतो.