Shakti Peeth Expressway:- महाराष्ट्र मध्ये जे काही नियोजित महामार्ग आहेत त्यामध्ये नागपूर ते गोवा हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे. जर आपण शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला तर समृद्धीनंतर वाहतूक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा असलेला हा शक्तीपीठ महामार्ग असून यामुळे नागपूर ते गोवा हे अंतर 21 तासांऐवजी 11 तासांमध्ये गाठता येणे शक्य होणार आहे.
एवढेच नाही तर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील एकोणावीस देवस्थाने जोडली जाणार असून 760 km चा हा सुपरफास्ट हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे व हा राज्यातील 13 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ तसेच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी हा महामार्ग खूप महत्त्वाचा असणार आहे.
परंतु आता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रखडेल अशी चिन्हे दिसत आहेत. नुकतीच या या महामार्गासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. परंतु होत असलेल्या या सर्वेक्षणाला कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे.
शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर ते गोवा या नव्या 800 किलोमीटर साठी उभारण्यात येणारा शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्त्वाचा महामार्ग असणारा असून तो राज्यातील 13 जिल्ह्यातून जाणार आहे. एवढेच नाही तर राज्यातील एकोणावीस देवस्थाने या महामार्गामुळे एकमेकांना जोडले जाणार आहेत.
नागपूर ते गोवा हे एकवीस तासाच्या अंतर या महामार्गामुळे 11 तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. नुकत्याच या महामार्गासाठी आवश्यक सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेले असून कोल्हापूर जिल्ह्यातून मात्र या महामार्गाला आता विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रस्तावित महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या कागल तालुक्यातील शेतकरी आता एकत्र झाले असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आता यांनी लढा सुरू केला आहे.या शेतकऱ्यांनी प्रशासनाला यासंबंधीचे निवेदन दिले असून या महामार्गासाठी सुरू असणारा सर्वे तात्काळ बंद करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
या नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत.शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असताना नवीन महामार्गाची गरज काय? असा देखील संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीत काय याबाबत निर्णय लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.