Satbara Utara : सातबारा उतारा हा खऱ्या अर्थाने शेतकरी असल्याचा पुरावा. सातबारा उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याची माहिती असते तसेच ती जमीन कोणाच्या मालकीची आहे याची देखील माहिती असते.
त्यामुळे हा उतारा जमीन खरेदी विक्री करण्यासाठी अति आवश्यक असतो. अनेकदा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील सातबारा उतारा आवश्यक असतो. मात्र हा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कडे जावे लागते.
परंतु शासनाने यामध्ये आता मोठा बदल केला असून सातबारा उतारा हा ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून मिळणार आहे. हा सदर बदल एक ऑगस्ट 2021 पासून लागू झाला आहे. या दिवसापासून सर्वसामान्य शेतकरी बांधवांना डिजिटल स्वाक्षरी चा ऑनलाईन सातबारा उतारा वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना आता सातबारा उतारा काढण्यासाठी तलाठी ऑफिस मध्ये जाण्याची बिल्कुल आवश्यकता नाही. अशा परिस्थितीत आज आपण ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा कशा पद्धतीने काढायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
ऑनलाईन सातबारा कसा काढायचा?
ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
वेबसाईटवर गेल्यानंतर digital signed 7/12 या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
जर तुम्ही या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तसेच पहिल्यांदा ऑनलाईन सातबारा उतारा काढत असाल तर OTP based login यावर क्लिक करायच आहे.
यानंतर इंटर मोबाईल नंबर या रकान्यात तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायच आहे.
यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो इंटर ओटीपी खाली दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करायचा आहे.
ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायच आहे.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे पर्याय दिसतील यापैकी digital signed 7/12 या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
यानंतर एक पेज ओपन होईल ज्या ठिकाणी “Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.” असं लिहिलेलं दिसेल. याचा अर्थ सातबारा उतारा काढण्यासाठी पंधरा रुपये उपलब्ध बॅलेन्स मधून कट केले जातील.
आपण पहिल्यांदाच सातबारा उतारा काढणारा असाल यामुळे आपल्या खात्यात बॅलन्स राहणार नाही. यासाठी आपल्याला सर्वप्रथम खात्यात बॅलन्स जमा करावा लागेल. अशा परिस्थितीत खात्यात बॅलन्स कसा जमा करायचा आहे हे जाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम यूपीआय, इंटरनेट बँकिंग यांसारखा पर्यायाचा वापर करून पैसे खात्यात जमा करू शकता.
पैसे जमा झाल्यानंतर आपण सातबारा उतारा च्या पेजवर परत गेला तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यात 15 रुपये जमा असल्याचे दिसेल.
आता ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा काढण्यासाठी त्या ठिकाणी फॉर्मवर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी.
माहिती भरल्यानंतर सगळ्यात शेवटी डाऊनलोड सातबारा या पर्यायावर क्लिक करायचं.
यानंतर सातबारा उतारा डाऊनलोड होईल. या उताऱ्यावर स्पष्टपणे नमूद केलेलं असतं की हा डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे यामुळे याला कोणत्याच सही किंवा शिक्क्याची आवश्यकता नाही.