Satara Successful Farmer : शेती हा भारतात केला जाणार एक मुख्य व्यवसाय आहे. देशाची निम्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शेती व्यवसायात वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
गेल्यावर्षी मानसून काळात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून फारशी कमाई झालेली नाही.
यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत. मात्र या अडचणीच्या काळातही काही शेतकऱ्यांनी शेतीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी गाव येथील एका प्रगतिशील शेतकऱ्यांनी दोन एकरातून दुष्काळी परिस्थिती असतानाही 75 लाख रुपयांची कमाई करून दाखवली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत या लखपती शेतकऱ्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
शिमला मिरचीची लागवड ठरली फायदेशीर
सोळशी गाव या दुष्काळी पट्ट्यातील जालिंदर सोळसकर या युवा शेतकऱ्याने ढोबळी मिरची लागवडीतून लाखो रुपये कमवले आहेत. ड्रिप इरिगेशन, स्टेजिंग आणि पेपर मिलेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या युवा शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या शेतीतून लाखो रुपये कमवले आहेत.
जालिंदर यांनी पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या दोन एकर जमिनीवर ढोबळी मिरचीची लागवड केली होती. दरम्यान या लागवड केलेल्या ढोबळी मिरचीच्या पिकातून आत्तापर्यंत 13 वेळा तोडणी पूर्ण झाली आहे.
यातून त्यांना तब्बल 150 टन एवढे उत्पादन मिळालेले आहे. विशेष म्हणजे या मिरचीच्या प्लॉटमधून त्यांना आणखी उत्पादन मिळणार आहे. या शेतकऱ्याला आत्तापर्यंत दोन एकरातून दीडशे टन माल मिळाला आहे.
या मिरचीची त्यांनी पन्नास रुपये प्रति किलो या सरासरी बाजार भावात विक्री केली आहे. अशा तऱ्हेने त्यांना या पिकातून 75 लाखांपर्यंतची कमाई होण्याची आशा आहे.
पिकासाठी 10 लाखाचा खर्च
जालिंदर सांगतात की, त्यांना या दोन एकरात लागवड केलेल्या ढोबळी मिरचीसाठी एकरी पाच लाख रुपयांचा खर्च करावा लागला आहे. म्हणजे दोन एकर जमिनीसाठी त्यांनी दहा लाख रुपये एवढा खर्च केला आहे.
यामुळे खर्च वजा जाता त्यांना या पिकातून 65 लाख रुपये एवढी कमाई होणार आहे. एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळामुळे शेतीतून फारशी कमाई होत नाहीये तर दुसरीकडे जालिंदर यांनी दुष्काळी पट्ट्यात ढोबळी मिरचीच्या लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. यामुळे जालिंदर यांच्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.