Sarkari Job : कोरोना या महाभयंकर आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण जगात मोठी हानी झाली होती. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला होता. आता या आजारापासून हळूहळू मानवी जीवन पुन्हा एकदा रुळावर येत आहे. मात्र कोरोनामुळे शासकीय नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लाखो नवयुवक तरुणांचे दोन वर्ष वाया गेलेत. अनेकांनी विविध संवर्गातील शासकीय पदांसाठी असलेली वयोमर्यादा ओलांडली.
यामुळे शासकीय नोकर भरतीसाठी असलेली वयोमर्यादा शितल करावी आणि यामध्ये दोन वर्षाची वाढ केली जावी अशी मागणी अनेकांकडून उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून तसेच इतर सामाजिक संस्थांकडून मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता एक मोठी माहिती समोर येत आहे. शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यादा शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस : आता नागपूरसह संपूर्ण राज्यात ‘ही’ वंदे भारत ट्रेन धावणार; नितीन गडकरीचा मास्टर प्लॅन आला नवीन स्वरूपात
शासकीय नोकर भरतीसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून द्यावी ही विद्यार्थ्यांची मागणी लवकरच मान्य होणार असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. खरं पाहता विविध कारणांमुळे राज्यात गेल्या चार वर्षांपासून सरळ सेवा भरती रखडलेली आहे. त्यामध्ये कोरोनाच्या दोन वर्षांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे राज्यसेवा भरती संदर्भात देखील असच चित्र तयार झाल आहे. गेल्या तीन वर्षात केवळ एकदाच राज्यसेवाची परीक्षा पार पडली आहे.
अशा परिस्थितीत लाखो तरुणांनी आपली वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत शासकीय भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की, देशातील काही राज्यांनी कोरोना नंतरच्या शासकीय भरतीसाठी वयोमर्यादा वाढवली आहे. राजस्थानमध्ये चार वर्षे वयोमर्यादा वाढवली आहे, मध्यप्रदेश आणि ओडिशा या राज्यात शासकीय भरतीसाठी तीन वर्षे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत सुरु झाली मोठी पदभरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज, वाचा सविस्तर
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगाना, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यातही दोन वर्षे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. खरं पाहता महाराष्ट्रात देखील पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून मिळाले आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना दोन वर्ष वयोमर्यादेत वाढ देण्यात आली आहे. याचप्रमाणे इतरही शासकीय भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी उमेदवारांची आहे.
दरम्यान आता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असून त्यांनी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून दोन वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला सूचना दिल्या असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. यामुळे याबाबत नेमका निर्णय केव्हा घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे पण वाचा :- Mhada : आनंदाची बातमी ! म्हाडाच्या घरासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; नागरिकांचा होणार असा फायदा