Sarkari Job : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच राहणार आहे. या पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड या ठिकाणी सफाई कामगार तसेच इतर विविध पदे भरली जाणार आहेत.
या पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने मात्र अर्ज करावयाचा आहे. अर्ज हा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या pune.cantt.gov.in या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे. शिवाय ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज सादर करता येणार आहे.
यासाठी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा लागेल आणि तो अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसहित भरलेला फॉर्म भारतीय टपालाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोळीबार मैदान, पुणे 411001, महाराष्ट्र येथे पाठवावा लागेल.
हे पण वाचा :- म्हाडा कोकण मंडळाची 4,654 घरांची सोडत; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरवात, बघा संपूर्ण टाइमटेबल एका क्लिकवर
या पदभरती अंतर्गत एकूण 167 पदे भरली जाणार असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 4 एप्रिल 2023 राहणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करावा लागणार आहे. एकूण 167 पदांसाठी भरती असून विविध पदे भरली जाणार आहेत यामध्ये सफाई कामगार या पदाचा देखील समावेश असून वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. मात्र सातवी ते दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ मार्गांवर धावणार ट्रेन; ‘हे’ असतील थांबे, पहा डिटेल्स
ही पदे भरली जाणार आहेत
- सफाई कर्मचारी: ६९ पदे
- कनिष्ठ लिपिक: 14 पदे
- माली (प्रशिक्षित): 5 पदे
- मजूर : ८ पदे
- स्टाफ नर्स : 3 पदे
- संगणक प्रोग्रामर : 1 जागा
- काम दुकान अधीक्षक : 1 पद
- अग्निशमन दल अधीक्षक : 1 पद
- सहाय्यक बाजार अधीक्षक : 1 पद
- जंतुनाशक : 1 पोस्ट
- ड्रेसर : 1 पोस्ट
- चालक : 5 पदे
- आरोग्य पर्यवेक्षक : 1 पद
- लॅब असिस्टंट : 1 जागा
- लॅब अटेंडंट (रुग्णालय ): 1 जागा
- लेजर क्लर्क : 1 पद
- नर्सिंग ऑर्डरली : 1 पोस्ट
- शिपाई : 2 पदे
- स्टोअर कुली : 2 पोस्ट
- चौकीदार : ७ पदे
- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी : 5 पदे
- आया : 2 पोस्ट
- हायस्कूल शिक्षक (B.Ed.) : 7 पदे
- फिटर : 1 पोस्ट
- आरोग्य निरीक्षक : ४ पदे
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) : 1 जागा
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ३ पदे
- लॅब टेक्निशियन : 1 पद
- ऑटोमेकॅनिक : 1 पद
- डी.एड शिक्षक : 9 पदे
- फायर ब्रिगेड : 3 पदे
- हिंदी टायपिस्ट : 1 पोस्ट
- मेसन : 1 पोस्ट
- पंप अटेंडंट : 1 पद
वर नमूद केलेल्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहणार आहे. यामुळे संबंधित पदांची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसूचना एकदा काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे. अधिसूचनेत दिलेली पात्रता ग्रहण करणारा उमेदवार पदांसाठी मात्र अर्ज करू शकणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर ! ‘या’ एसटी आगारात विविध पदांसाठी भरती सुरू; 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार, इतकं मिळणार वेतन