Rooftop Solar Yojana Maharashtra : रूफ टॉप सोलर योजनेला महाराष्ट्रात मोठी पसंती लाभली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान प्राप्त करून महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सोलर पॅनल आपल्या घराच्या छतावर बसवले आहेत. राज्यात 76,808 वीज ग्राहकांनी रुफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे.
या लाभार्थ्यांकडून 1 हजार 359 मेगावॉट वीज निर्मिती क्षमता गाठली गेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रूप-टॉप सोलर योजना ही पारंपारिक ऊर्जा स्त्रोतावर डिपेंडंट न राहता अपारंपारिक किंवा अक्षय ऊर्जा स्रोतांपासून वीज संकलित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांना घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देखील दिले जाते. घराच्या छप्परवर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसवून वीज निर्मिती करायची आणि ही तयार झालेली वीज स्वतः वापरायची तसेच उर्वरित वीज महावितरणाला द्यायची अशी ही योजना आहे.
योजनेअंतर्गत कोणाकडून आणि किती अनुदान मिळतं?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रुफ टॉप सोलर योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. तीन किलो वॅट ते दहा किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर वीस टक्के इतके अनुदान शासनाकडून मिळत असतं. आता प्रत्यक्ष अनुदान किती मिळतं आणि यासाठी खर्च किती होतो हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून हे गणित समजून घेऊया. खरं पाहता तीन किलो वॅट पर्यंत वीज निर्मितीची क्षमता असलेले सोलर पॅनल बसवण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा खर्च येतो. आता यासाठी 40 टक्के अनुदान मिळते. म्हणजेच 48 हजाराचे अनुदान या योजनेअंतर्गत संबंधित अर्जदाराला मिळू शकते. अशा परिस्थितीत संबंधित वीज ग्राहकाला या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करून तीन किलो वॅटचे सोलर पॅनल इस्टॅब्लिश करण्यासाठी जवळपास 78000 चा खर्च येतो.
अर्ज कुठे करायचा
या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान प्राप्त करणे हेतू संबंधित वीज ग्राहकाला महाडिस्कॉम डॉट इन / आयस्मार्ट या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. यां योजनेसाठी महावितरण कडून संपूर्ण मदत दिली जात असते.
या योजनेबाबत महावितरणचे अध्यक्ष विजय सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरऊर्जेतून निर्माण होणाचा विजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो. यामुळे वीज बिलात मोठी कपात होते. सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवण्याची सोय केली जाते. विशेष म्हणजे संबंधित वीज ग्राहकाकडून वीज कंपनीला जी उर्वरित वीज दिली जाते कंपनी त्या मोबदल्यात वीज बिलात सवलत देते. यातून कधीकधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीज बिलही येते. एकंदरीत सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षात भरून निघत असतो.