Rooftop Solar Scheme : 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री क्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उदघाट्न झाले. त्या दिवशी श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान महोदय यांनी पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती दिली.
या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना दर महिना 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळू शकते अशी माहिती शासनाने दिली. मग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ फेब्रुवारी रोजी अद्ययावत रूफटॉप सौर योजनेला मंजुरी दिली. दरम्यान, यावेळी पीएम सूर्योदय योजनेचे ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ असे नवीन नानकरण करण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही योजना 2 kW सिस्टीमसाठी सिस्टीम खर्चाच्या 60 टक्के सबसिडी आणि 2 ते 3 kW क्षमतेच्या सिस्टीमसाठी 40 टक्के सबसिडी देते. खरे तर याआधी देखील सोलर पॅनलसाठी योजना सुरु होती.
जुन्या योजनेला सोलर रूफटॉप योजना असे नाव आहे. पण, या नव्याने घोषित करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत जुन्या योजनेपेक्षा अधिक सबसिडी दिली जात आहे. नवीन योजनेंतर्गत, 1-किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टीम बसविणाऱ्या प्रत्येकासाठी किमान अनुदान 30,000 रुपये असेल.
2-किलोवॅट यंत्रणा बसवणाऱ्यांसाठी 60,000 रुपये अनुदान दिले जाईल. दरम्यान आता आपण या नव्याने जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत सोलर पॅनल साठी अर्ज करण्याची प्रोसेस सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा अर्ज करणार ?
या नव्या योजनेसाठी www.pmsuryagarh.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. सर्वप्रथम संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर अर्जदाराला नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी राज्य आणि वीज वितरण कंपनी सिलेक्ट करून वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी दिलेल्या रकान्यात भरावा लागणार आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मग अर्ज करण्यासाठी पुन्हा लॉगिन घ्यावे लागणार आहे. यानंतर मग सोलर रूफटॉपसाठी अर्ज करावा लागेल. मग ग्राहकाला स्थानिक डिस्कॉमच्या मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागेल.
एकदा मंजूरी मिळाली की, मग अर्जदाराला त्याच्या डिस्कममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर प्लांट स्थापित करता येईल. सोलर पॅनल इन्स्टॉल झाले की मग याची माहिती संकेतस्थळावर अपडेट करावी लागणार आहे.
तसेच नंतर नेट मीटर साठी अर्ज करावा लागेल. एकदा नेट मीटरची इन्स्टॉलेशन पूर्ण झाले की मग डिस्कॉमकडून याची पाहणी केली जाणार आहे.
यानंतर मग सदर पोर्टलवर एक कमिशनिंग सर्टिफिकेट इशू होईल. दरम्यान हे कमिशनिंग सर्टिफिकेट इशू झाल्यानंतर सदर ग्राहकाला आपल्या बँक खात्याचा तपशील आणि एक रद्द झालेला चेक या पोर्टलवर जमा करावा लागणार आहे. यानंतर मग अवघ्या तीस दिवसांच्या कालावधीत सदर ग्राहकाच्या खात्यात सबसिडीची रक्कम वर्ग केली जाणार आहे.