Rice Farming : शेतकरी मित्रांनो (Farmer), भात (Rice Crop) हे आपल्या देशातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची आपल्या देशात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील धान पिकाची (Paddy Crop) लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
धान उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात 4000 हजाराहून अधिक धानाच्या जाती उगवल्या जातात. मात्र आज आपण धानाच्या काही निवडक जाती जाणून घेणार आहोत ज्या अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊ या भाताच्या काही प्रमुख जाती (Rice Variety) आणि त्यांच्या विशेषता थोडक्यात.
जया धान :- मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, भाताची ही जात कमी उंचीची सुधारित जात आहे. याचे दाणे लांब व पांढरे असतात. भाताची ही जात 130 दिवसात तयार होते. या जातीच्या भाताच्या वनस्पतीची उंची 82 सेमी पर्यंत पोहोचते. बीएलबी, एसबी, आरटीबी आणि ब्लास्ट या रोगास प्रतिरोधक जात आहे. या जातींचे सरासरी उत्पादन हेक्टरी 50 ते 60 क्विंटल असते. भारतातील सर्व राज्यांमध्ये याची लागवड करता येते.
PHB-71 :- या जातीचे दाणे लांब, चमकदार आणि पांढरे असतात. या जातींचे भात पीक 130 ते 135 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते. या जातीच्या झाडाची उंची 115 ते 120 सेमी पर्यंत असते. ही जात बीपीएच, जीएम आणि ब्लास्ट रोगास सहनशील आहे. सरासरी उत्पादन हेक्टरी 87 क्विंटलपर्यंत आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे प्रामुख्याने या जातीची लागवड केली जाते.
CSR-10 :- या जातीची झाडे लहान आणि पांढर्या रंगाची असतात. या जातींचे भात पीक 115 ते 120 दिवसात उत्पादन देण्यास तयार होते. त्याच्या वनस्पतीची उंची 80 ते 85 सेमी पर्यंत पोहोचते. सरासरी 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. याची लागवड प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गोवा, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात केली जाते. निश्चितच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी या जातीची लागवड फायदेशीर ठरणारी आहे.
IR 64 :- मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीचे दाणे लांब असतात पण वनस्पती लहान असते. 120 ते 125 दिवसांत ते पिकण्यास तयार होते. त्याचे उत्पादन हेक्टरी 50 ते 55 क्विंटल आहे. याची लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गोवा, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात केली जाते. जातीची लागवड देखील महाराष्ट्रातील शेतकरी बांधव करू शकत असल्याने या जातीचा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.