Rice Farming: सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरू आहे. त्यामुळे देशातील शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र देशात तसेच राज्यातही बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामातील धान पिकाची देखील लागवड (Paddy Farming) करत असल्याचे चित्र आहे.
धान अर्थात भात खरीप हंगामात लागवड केल्या जाणार्या मुख्य पिकांपैकी एक आहे. धानाची खरीप हंगामात लागवड केल्यास शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन (Farmer Income) मिळत असते. कृषी तज्ज्ञांच्या मते जर शेतकरी बांधवांनी भाताच्या सुधारित जातींची (Paddy Variety) लागवड केली तर निश्चितच त्यांना लाखो रुपयांचा नफा यातून मिळू शकतो.
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी धानाच्या एका विशेष आणि सुधारित जातीची (Rice Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आम्ही भाताच्या पुसा बासमती 1692 या जातीची माहिती सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (IARI) म्हणण्यानुसार पुसा बासमती 1692 ही भाताची जात भाताची एक सुधारीत जात आहे. ही बासमती तांदळाची जात शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना बासमतीचे एकरी 27 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
पुसा बासमती 1692 व्हरायटी
तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या बियाण्याबद्दल माहिती असेलच. हे बियाणे कमी कालावधीचे पीक आहे. हे बियाणे शेतात लावल्याने 115 दिवसात पीक तयार होते. या प्रकारचा तांदूळ सुरक्षित असून तो फार काळ तुटत नसल्याचेही दिसून आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत उभा भात सहज मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल, कारण या भाताची किंमत बाजारात सर्वाधिक आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा उत्तम मार्ग
पुसा बासमतीची ही जात जून 2020 मध्ये तयार करण्यात आली. हा भाताचा अगदी नवीन प्रकार असल्याने त्याची उपलब्धता मर्यादित आहे. या जातीचे बियाणे आणि तांदूळ दोन्हीची किंमत बाजारात जास्त असल्याने या प्रकारच्या बियाण्यांची लागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुसा कृषी मेळाव्यात या जातीचे बियाणे बहुतांश शेतकऱ्यांनी खरेदी केले होते.
बासमती तांदूळ निर्यात
बासमती तांदळाचे उत्पादन भारतातच सर्वाधिक होते आणि भारत त्याची सर्वाधिक निर्यातही करतो. एका अहवालानुसार, बासमती तांदळाची वार्षिक 30 कोटी रुपयांहून अधिक निर्यात केली जाते. पाहिले तर जगभरात सुमारे दीडशे देश बासमतीचे शौकीन आहेत, त्यामुळे या प्रकारच्या बियाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.