Remal Cyclone Affect Monsoon : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील वातावरणात मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळत आहे. वातावरणात सातत्याने काही ना काही बदल होत आहेत. सध्या महाराष्ट्रात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ पाहायला मिळत आहे. या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र भाजून निघाला आहे. दुसरीकडे, राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे.
आज देखील राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असाही अंदाज देण्यात आला आहे. हवामानाची ही विषम परिस्थिती शेतकऱ्यांची चिंता वाढवत असतानाच आता भारतावर चक्रीवादळाचा नव संकट उभ राहील आहे.
या चक्रीवादळामुळे आगामी मान्सूनवर परिणाम होणार का ? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान याच चक्रीवादळासंदर्भात भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. खरेतर 19 मेला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले होते. तदनंतर मान्सूनचा पुढील प्रवास सुरु झाला. विशेष म्हणजे आयएमडीने येत्या 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच महाराष्ट्रात यंदा दहा ते अकरा जुनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो असे बोलले जात आहे. म्हणजेच मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. अशातच मात्र रेमल चक्रीवादळाने आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे मानसून 2024 वर विपरीत परिणाम होत आहे.
आतापर्यंत मान्सूनचा जलद गतीने प्रवास सुरू होता, पण अचानक हे चक्रीवादळ तयार झाले आणि यामुळे मान्सूनच्या प्रवासावर परिणाम होत आहे. मान्सूनचा प्रवास थोडासा थंडावला असल्याचे बोलले जात आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासात हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
यामुळे, 31 मे ला केरळात दाखल होणाऱ्या आणि 11 जुनच्या सुमारास महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनच्या आगमनाला काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच, या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाहीये. राज्यात आगामी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
27 मे पर्यंत राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. खानदेश आणि विदर्भात दिवसाचे कमाल तापमान 45 अंशाच्या पुढे गेले आहे. जळगाव आणि अकोला मध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नुकतीच नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे येत्या काही दिवसात या तापमानात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण आणखी वाढणार आहे. पण, राज्यातील मराठवाडा, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो असे देखील भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मुंबईत देखील काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळाचा मान्सूनवर विपरीत परिणाम होत असून यामुळे मान्सूनचा प्रवास लांबु शकतो अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. तसेच या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
परंतु या चक्रीवादळाचा थेट परिणाम आपल्या महाराष्ट्रावर होणार नाहीये. म्हणजेच या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठेच अवकाळी पाऊस होणार नाही असा अंदाज आहे. परंतु यामुळे मान्सून आगमन विलंबाने होईल अशी भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.