Ration Card News : केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असतो. सरकार रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात अन्नधान्य सुद्धा उपलब्ध करून देते. रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळापासून रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. असे असतानाच केंद्रातील सरकारने काही रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. यामुळे रेशन कार्ड धारकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील 5.8 कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. डिजिटललायझेशन ड्राइव्ह सुरू झाल्यानंतर सरकारला अनेक बनावट शिधापत्रिका अस्तित्वात असल्याचे समजले.
दरम्यान याच 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या आधार आणि इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रियेच्या माध्यमातून देशात 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका अस्तित्वात असल्याचे उघडकीस आले.
दरम्यान आता याच शिधापत्रिका रद्द करण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असल्याची माहिती हाती येत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 64% शिधापत्रिका धारकांची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे उर्वरित लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच शिधापत्रिका धारकांची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे देशात अजूनही अनेक बनावट शिधापत्रिका आढळण्याची शक्यता असून या बनावट शिधापत्रिका देखील भविष्यात रद्द केल्या जाणार आहेत.
याचा परिणाम म्हणून अपात्र लोकांना रेशन कार्ड च्या यादी मधून वगळले जाणार आहे आणि पात्र लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. दुसरीकडे सरकारकडून वन नेशन वन रेशन योजना देखील सुरू करण्यात आले असून या योजनेचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात भविष्यात फायदा होणार आहे.