Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना रास्त भावात अन्न धान्य उपलब्ध करून दिले जाते. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना स्वस्त दरात अन्न धान्य मिळावे यासाठी रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिला जातो.
यासोबतच काही मोजक्या रेशन कार्डधारकांना रास्त भावात साखरही मिळते. ज्या लोकांचे अंत्योदयचे रेशन कार्ड आहे त्यांना साखर दिली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळापासून रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान जर तुम्हीही रेशनचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड ची केवायसी करावी लागणार आहे. पण, या केवायसी प्रक्रियेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे.
त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार जे लोक रेशन कार्डची केवायसी करणार नाही त्या लोकांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
म्हणजेच अशा लोकांना रेशन मिळणार नाही. यामुळे आज आपण रेशन कार्ड ची केवायसी कशी करायची या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन कार्ड ची केवायसी कशी करणार?
जर तुम्ही अजून रेशन कार्ड ची केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी रेशन दुकानात भेट द्यावी लागणार आहे. रेशन कार्ड मध्ये जेवढ्या लोकांची नावे असतील त्या सर्व लोकांना आपले आधार कार्ड घेऊन जवळील रेशन दुकानात भेट द्यायची आहे. रेशन दुकानात गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या मदतीने केवायसी ची प्रक्रिया करावी लागणार आहे.
रेशन दुकानातला ऑपरेटर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड क्रमांक ई-पास मशीनवर टाकेल. मग आधार कार्ड क्रमांक अपडेट केल्यानंतर आता तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे बोटांचे ठसे स्कॅन करून त्यांचे KYC अपडेट केले जाईल.
अशा तऱ्हेने तुमची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एकंदरीत केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील रेशन दुकानात जावे लागणार आहे. ही प्रक्रिया घरून ऑनलाईन करता येत नाही.
यामुळे ज्या लोकांनी अजून रेशन दुकानात जाऊन ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही.