Ration Card News : तुम्हाला रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव जोडायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. घरात नव्या बाळाचा जन्म झाला किंवा नववधूचे आगमन झाले तर अशा नव्या सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडावे लागते. रेशनिंगचा लाभ घेण्यासाठी, रेशन कार्ड धारकांना जे अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते
त्याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे असणे आवश्यक असते. याशिवाय इतरही शासकीय कामांमध्ये आणि शासकीय योजनांसाठी रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव असणे अनिवार्य आहे.
अशा परिस्थितीत आज आपण घरात जन्मलेल्या नव्या बाळाचे किंवा घरात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड वर कसे जोडायचे? याची सविस्तर प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे जोडणार नवीन सदस्याचे नाव?
अलीकडे रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडणे फारच सोपे झाले आहे. रेशन कार्ड धारकांना घरबसल्या नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये ऍड करता येते. महत्त्वाचे म्हणजे यासाठी फार लांबलचक प्रोसेस देखील नाहीये.
अवघ्या पाच मिनिटात तुम्ही तुमच्या घरातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडू शकता. जर तुम्हाला तुमच्या घरात जन्मलेल्या नव्या बालकाचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडायचे असेल तर यासाठी त्या सदर बालकाचे जन्म प्रमाणपत्र आणि त्याच्या पालकांचे आधार कार्ड लागणार आहे. सोबतच रेशन कार्ड आणि त्याची फोटोकॉपी देखील लागणार आहे.
जर तुम्हाला तुमच्या घरात आलेल्या नव्या सुनेचे, नववधूचे नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये जोडायचे असेल तर यासाठी नवविवाहित महिलेचे आधार कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट, पालकांचे रेशन कार्ड आणि तिच्या माहेरच्या रेशन कार्ड मधील म्हणजेच तिच्या पालकाच्या रेशन कार्ड मध्ये तिचे नाव कमी केल्याबाबतचा दाखला अशी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
आता ही कागदपत्रे जमवल्यानंतर तुम्ही राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तुम्हाला वेबसाईट मध्ये लॉगिन घ्यायचे. यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागणार आहे.
लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर लॉगिन करायचे आहे आणि मग तुम्हाला रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड करणे या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज ओपन होईल हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्या नव्या सदस्याचे नाव ॲड करायचे आहे त्याची सर्व डिटेल भरावी लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे देखील अपलोड करावी लागणार आहेत.
अर्ज भरून झाला नंतर कागदपत्रे अपलोड करून झाले की तुम्हाला हा अर्ज सबमिट करावा लागणार आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
तुमचा अर्ज कुठेपर्यंत पोहोचला म्हणजेच तुमचा अर्ज ट्रॅक करण्यासाठी हा रजिस्ट्रेशन नंबर वापरता येईल. अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे आणि या पडताळणीमध्ये सर्व काही बरोबर आढळल्यास, घरातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड वर जोडले जाणार आहे.