Ration Card News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील रेशन कार्डधारकांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर रेशन कार्ड हे शासनाच्या माध्यमातून जारी केले जाणारे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. शासनाकडून रेशन कार्ड धारकांना राष्ट्रभावात अन्नधान्य दिले जाते.
कोरोना काळापासून तर रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. देशभरातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील नागरिकांना शासनाच्या निर्णयाचा फायदा होत आहे.
अशातच मात्र रेशन कार्ड धारकांना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आले आहेत. जे नागरिक रेशन कार्ड साठीच्या केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द होईल आणि त्यांना रेशन मिळणार नाही असेही सांगितले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्डची केवायसी करणे आता सोपे झाले असे. आता रेशन कार्ड धारकांना कुठूनही केवायसी करता येणार आहे. शिधापत्रिकाधारक देशात कुठेही असतील तरी ते त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन ई-केवायसी करू शकणार आहेत.
आधी केवायसी करण्यासाठी शिधापत्रिका धारकांना त्यांच्या मूळ गावी जावी लागत होते. पण आता ही नवीन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या शहरांमध्ये राहणाऱ्या कामगारांना ते जिथे काम करतात तिथूनच केवायसी पूर्ण करता येणार आहे.
ई-केवायसी सोबतच रेशनकार्डशी मोबाईल नंबर लिंक करण्याची सुविधाही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवायसी करण्यासाठी 31 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ही मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली.
आता ही मुदत आणखी एका महिन्यांनी वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता नागरिकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल अशी माहिती समोर येत आहे.