Ram Mandir : काल अर्थातच 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उद्घाटन संपन्न झाले आहे. श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिरात श्री रामरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात राममय वातावरण पाहायला मिळत आहे. राम भक्तांमध्ये मोठे आनंदाचे आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान राम मंदिराचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर, राम मंदिर राष्ट्राला समर्पित झाल्यानंतर आता संपूर्ण भारतीयांचे केंद्र शासनाच्या आगामी बजेट कडे लक्ष लागले आहे. केंद्र शासनाचा केंद्रीय अर्थसंकल्प पुढील महिन्यात सादर होणार आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा बजेट राहणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला की, लगेचच काही दिवसांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे हा अर्थसंकल्प संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरेल अशी आशा आहे.
या अर्थसंकल्पात समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी देखील शासनाकडून काही कौतुकास्पद निर्णय घेतले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत आता वाढ होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता दिला जातोय.
आता मात्र या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत आणखी दोन हजाराची वाढ होणार आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 8,000 रुपये मिळू शकतात. याबाबतची घोषणा येत्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून होईल अशी शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी करण्यासाठी पीएम किसान योजनेची रक्कम सहा हजारावरून आठ हजारापर्यंत वाढवली जाणार आहे.
याबाबत केंद्राच्या माध्यमातून अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र आगामी निवडणुका पाहता केंद्रातील मोदी सरकार निश्चितच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकते अशी आशा आहे.
पीएम किसानचा 16 वा हफ्ता केव्हा ?
पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते देऊ करण्यात आले आहेत. पंधरावा हप्ता गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2023 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मागील हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला.
यामुळे आता या योजनेचा सोळावा हप्ता केव्हा येणार हा सवाल उपस्थित केला जातोय. मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा सोळावा हफ्ता फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो.