Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हवामानात बदल पाहायला मिळत आहे. हवामान बदलामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर अन डिसेंबर महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट पाहायला मिळाली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती समोर आली होती.
यानंतर या चालू मार्च महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने व गारपिटीने झाली.मार्च महिन्यात राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेश मधील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशातच आता हवामान खात्याने उद्यापासून अर्थातच अकरा मार्चपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने उत्तर भारतात पावसाचा अंदाज दिला आहे.
आय एम डी ने 11 ते 14 मार्च 2024 दरम्यान उत्तर भारतात पाऊस हजेरी लावणार असे सांगितले आहे. उत्तर भारतात पावसाची शक्यता असल्याने आपल्या महाराष्ट्रात हवामान कसे राहणार ? हा मोठा सवाल आहे.
कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ?
IMD ने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात असे म्हटले गेले आहे की, वायव्य सीमेवरून प्रवेश करणारे पश्चिमी वाऱ्यांचे झोत प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्रावरुन येत आहेत.
याचा परिणाम म्हणून एक नवीन हवामान प्रणाली विकसित झाली आहे आणि यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दहा ते बारा मार्च या कालावधीत उत्तरेकडील उत्तराखंड राज्यात हलक्या पावसासह बर्फवृष्टीची शक्यता सुद्धा देण्यात आली आहे.
तसेच IMD, १२ आणि १३ मार्चला पंजाबमध्ये, १३ मार्चला हरियाणा, राजधानी दिल्लीसह पश्चिमी उत्तर प्रदेशात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे.
याशिवाय, या चार दिवसांच्या कालावधीत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश या राज्यांत देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही.