Railway Tatkal Ticket Booking : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक कामाची बातमी आहे. तुम्हीही कधी नां कधी रेल्वेने प्रवास केला असेल नाही का? मग तुम्हाला रेल्वेच्या कन्फर्म तिकीट साठी किती मेहनत घ्यावी लागते हे चांगले ठाऊक असेल. विशेष म्हणजे अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळतच नाही. तसेच, अनेकजण रेल्वेच्या आय आर सी टी सी च्या एप्लीकेशन वर जाऊन तात्काळ तिकीट बुकिंग करतात.
पण, तात्काळ तिकीट बुकिंग साठी योग्य वेळी लॉगिन घेऊनही अनेकांना तिकीट मिळत नाही ही वास्तविकता आहे. तुम्हाला सुद्धा असा अनुभव कधी ना कधी आलाच असेल. मात्र आज आम्ही रेल्वे प्रवाशांसाठी अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तात्काळ तिकीट मिळवता येणे शक्य होणार आहे.
तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी कधी लॉगिन केले पाहिजे
अनेक जण तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी योग्य वेळी लॉगिन घेण्याचा प्रयत्न करतात मात्र एकाच वेळी अनेकजण तिकीट बुक करण्यासाठी आय आर सी टी च्या एप्लीकेशन मध्ये लॉगिन घेतात आणि यामुळे एप्लीकेशन हँग होते.
यामुळे जर तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करायचं असेल तर तिकीट बुक करण्यासाठी जी निर्धारित वेळ आहे त्या वेळेपेक्षा तीन ते 5 मिनिटे अगोदर लॉगिन घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आय आर सी टी सी च्या वेबसाईटवर एसी श्रेणीच्या गाड्यांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग दररोज सकाळी दहा वाजेपासून सुरू होते. तसेच स्लीपर्स श्रेणीच्या गाड्यांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग दररोज सकाळी 11 वाजेपासून सुरू होते.
म्हणजे जर तुम्हाला एसी श्रेणीच्या गाडीसाठी तात्काळ तिकीट बुकिंग करायची असेल तर दहा वाजायला तीन ते 5 मिनिटे बाकी आहेत तेव्हाच लॉगिन घ्यावे लागणार आहे. तसेच स्लीपर्स श्रेणीच्या गाडीसाठी तात्काळ तिकीट बुकिंग करायची असेल तर अकरा वाजायला तीन ते पाच मिनिटे बाकी आहेत तेव्हाच लॉगिन घ्यायचे आहे.
आता अनेकजण तात्काळ तिकीट बुकिंग साठी दहा ते पंधरा मिनिटे अगोदरच लॉगिन घेतात. मात्र असे केले तर तात्काळ तिकीट बुकिंगची विंडो उघडल्यावर तुमचे लॉगिन सत्र ताबडतोब एंड होऊ शकते. तसेच तिकीट बुकिंग सुरू होण्याच्या एक दोन मिनिटे आधी लॉगिन करू नये अशा वेळी हार्ड ट्रॅफिकमुळे लॉगिन अडकू शकते.
हे एक काम अवश्य करा
तत्काळ तिकीट बुकिंग करण्यापूर्वी तुम्ही IRCTC च्या अधिकृत साइटला भेट देऊन एक मास्टर लिस्ट सुद्धा बनवली पाहिजे. यामुळे तात्काळ तिकीट बुकिंग ची शक्यता वाढते.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे मास्टरलिस्ट बनवली असेल तर तत्काळ बुकिंगच्या वेळी प्रवाशांचे तपशील भरण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. यामुळे साहजिकच तात्काळ तिकीट बुकिंग ची शक्यता वाढते.