Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आपापल्या स्तरावर वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. शासनाने दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी वेगवेगळ्या महामार्गाची कामे हाती घेतली आहेत.
याशिवाय, शहरा-शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विविध रेल्वे मार्ग देखील प्रस्तावित करण्यात आले आहेत. एका शहरातून दुसऱ्या शहरात जलद गतीने प्रवास करता यावा यासाठी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहे. अशातच देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावू पाहणाऱ्या एका महत्वाच्या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मोदी सरकारने नुकताच एक महत्त्वाचा रेल्वे कॉरिडॉर पूर्ण केला आहे.
हा एकच रेल्वे कॉरिडॉर देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम करणार आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन संजीवनी मिळणार आहे. यामुळे वेगवेगळे उद्योगधंदे सुरू होणार आहेत. साहजिकच हा रेल्वे कॉरिडोर रोजगार निर्मितीसाठी मोलाची भूमिका बजावणार आहे.
हा रेल्वे कॉरिडॉर 1337 किलोमीटर लांबीचा आहे. खरतर केंद्रातील मोदी सरकारने देशातील प्रमुख बंदर मुंबई आणि कोलकत्ता यांना दिल्ली, पंजाब सारख्या क्षेत्राशी जोडण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे DFC हा प्रकल्प हाती घेतला होता.
या प्रकल्पांतर्गत दोन रेल्वे कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. दरम्यान या प्रकल्पाचा एक भाग अर्थातच पूर्व डी एफ सी म्हणजेच पश्चिम बंगाल ते पंजाब असा रेल्वे कॉरिडॉर सुरू झाला आहे. हा स्पेशल गुड ट्रेन रेल्वे कॉरिडोर राहणार आहे. म्हणजेच या कॉरिडोर वर फक्त मालवाहतूक ट्रेन धावणार आहेत.
त्यामुळे मालाची वाहतूक जलद गतीने होणार आहे. परिणामी उद्योगधंद्यांना बळ मिळणार आहे. गेल्या महिन्यात या कॉरिडोरच्या एका विभागावर चाचणी घेण्यात आली होती आणि आता हा कॉरिडॉर प्रत्यक्षात सुरू झाला आहे. सध्या देशात फक्त पूर्व डीएफसी पूर्ण झाले आहे.
जेव्हा मुंबई ते नोएडा पश्चिम डीएफसी तयार होईल, तेव्हा ते देशाच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने बूस्टर देण्याचे काम करणार आहे. या कॉरिडॉरमुळे रस्त्यांवरील वाहतूक कमी होणार आहे. खरंतर सध्या स्थितीला मालवाहतूक गाड्या या पॅसेंजर गाड्यां ज्या रेल्वे मार्गावर धावतात त्याच ठिकाणी सुरू आहेत.
अशा परिस्थितीत रेल्वे मालवाहतूक खूपच संथ गतीने होत आहे. त्यामुळे अनेक उद्योग रेल्वेने मालवाहतूक करण्याऐवजी रस्ते मार्गाने मालवाहतूक करतात. मात्र हे कॉरिडॉर विकसित झाले तर यामुळे उद्योग रेल्वेने मालवाहतूक करतील.
परिणामी उद्योगांना जलद गतीने माल मिळू शकणार आहे आणि यामुळे साहजिकच रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. या कॉरिडॉरमुळे वेगवेगळ्या शहरांची, उद्योगांची निर्मिती होणार आहे. म्हणून हा कॉरिडॉर देशाच्या एकात्मिक विकासासाठी मोठा फायदेशीर ठरेल असा आशावाद व्यक्त होत आहे.