Railway News : राजधानी मुंबईमधल्या नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी खास आहे. सध्या स्थितीला दरवर्षीप्रमाणे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
उन्हाळी सुट्टीमुळे अनेकजण आपल्या मूळ गावाकडे रवाना होत आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या असल्याने काही जण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. शिवाय सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे आणि सणासुदीचा देखील हंगाम चालु आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अतिरिक्त गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे अन कोकण रेल्वे यांच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान विशेष साप्ताहिक उन्हाळी गाडी चालवली जाणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष उन्हाळी विशेष गाडीचे वेळापत्रक आणि स्टोपेज याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
कसं राहणार वेळापत्रक ?
एल टी टी-कोचुवेली ही साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी 11 एप्रिल ते सहा जून पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुरुवारी चालवली जाणार आहे. या दिवशी ही गाडी सायंकाळी चार वाजता सुटणार आहे.
कोचुवेली-LTT ही उन्हाळी विशेष गाडी 13 एप्रिल ते आठ जून या कालावधीमध्ये चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी दर शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी कोचुवेली स्थानकावरून सोडली जाणार आहे.
कोण-कोणत्या स्टेशनवर थांबणार?
या उन्हाळी विशेष गाडीला राज्यातील ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड या कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
शिवाय ही गाडी मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मनाग्लुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनूर जं., एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन या स्थानकावर थांबणार अशी माहिती समोर आली आहे.