Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे बोर्डाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलायं. मध्य महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मिरज ते जयनगर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार असून या गाडीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. ही एक साप्ताहिक ट्रेन राहणार असून या गाडीचा नव्या वेळापत्रकात समावेश करण्यात आला आहे.
ही गाडी थेट बिहारमध्ये जाणार असल्याने मध्य महाराष्ट्रातून ज्या नागरिकांना बिहारला जायचे आहे त्यांच्यासाठी ही गाडी फायद्याची ठरेल. ही ट्रेन मिरजेतून थेट बिहारला जाणारी ही गाडी प्रवासी, व्यापार, उद्योजक, कामगार व औद्योगिक क्षेत्रासाठी सोयीची आहे.
या ट्रेनला नव्या वेळापत्रकात स्थान देण्यात आले आहे पण ही गाडी अजून सुरू झालेले नाही. सुमारे दोन आठवड्यात या विशेष गाडीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मिरजेतून प्रयागराज येथे कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी ही गाडी फायद्याची ठरणार आहे.
भाविकांना डोळ्यापुढे ठेवून ही गाडी चालवली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण मिरज ते जयनगर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
या विशेष एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक रेल्वेने जारी केले आहे. त्यानुसार ही रेल्वे जयनगर येथून दर मंगळवारी रात्री ११.५० वाजता सुटणार आहे अन मिरजेत गुरुवारी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.
तसेच मिरजेतून ही गाडी दर शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता सुटेल व जयनगर येथे रविवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीमुळे मध्य महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ही गाडी पुण्यातून जाणार असल्याने पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी देखील ही गाडी फायद्याची ठरेल.
ही गाडी कुठं थांबणार
या गाडीस पुणे, मनमाड, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, दानापूर, पटना जंक्शन, समस्तीपूर व दरभंगा या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.