Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाली असून प्रवाशांना याचा मोठा फायदा होतोय. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.
अशातच भारतीय रेल्वे आणखी एक मोठा भीम पराक्रम करण्यास सज्ज असल्याची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे आता थेट पाण्यावर चालणारी रेल्वे गाडी सुरू करणार आहे.
भारतीय रेल्वे आता हायड्रोजन वर म्हणजेच पाण्यावर चालणारी रेल्वे गाडी चालवणार असून या गाडीचे ट्रायल रन लवकरच सुरू होणार असल्याची खात्रीलायक बातमी आता हाती आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की डिसेंबर 2024 मध्ये या गाडीची ट्रायल रन होणार आहे. देशातील एकूण 35 मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. हायड्रोजन ट्रेन बनवण्यासाठी जवळपास 80 कोटी रुपयांचा खर्च येतो.
हायड्रोजनवर धावणाऱ्या या ट्रेनमध्ये डिजल इंजिनाऐवजी हायड्रोजन फ्यूल सेल्स असतात. यामुळे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन यांचे उत्सर्जन होणार नाही. अर्थातच या गाड्यांमुळे पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाणार आहे.
या हायड्रोजन ट्रेन संदर्भात तज्ञांनी मोठी माहिती दिली आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या ट्रेनमध्ये जे हायड्रोजन फ्यूल सेल्स वापरले जाते यामुळे हायड्रोजन आणि ऑक्सीजन बदलून वीज निर्माण केली जात असते. दरम्यान हीच वीज ट्रेन चालवण्यासाठी वापरली जाते.
याचा फायदा असा होता की, हायड्रोजन गॅसवर धावणारे इंजिन धुराऐवजी पाण्याची बाष्प बाहेर सोडत असतो. तसेच,डिझेल इंजिनच्या तुलनेत 60 टक्के आवाज कमी करते. त्याचा वेग आणि प्रवाशी संख्याही डिझेल इंजिनासारखीच असते हे विशेष.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पाण्यावर चालणारी ट्रेन देशातील नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हरियाणातील सोनीपत ते जिंद या मार्गावर ही गाडी सर्वप्रथम चालवली जाणार आहे. या 90 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही गाडी सर्वप्रथम धावणार अशी माहिती हाती आली आहे.
एवढेच नाही तर देशातील दार्जिंलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माउंटेन रेल्वे, कालका शिमला रेल्वे, माथेरान रेल्वे, कांगडा घाटी, बिलमोरा वाघई आणि मारवाड-देवगढ मदारिया मार्गावर सुद्धा या गाडीचे संचालन सुरू होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
ही गाडी १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम असून जेव्हा ही गाडी भारतात सुरू होईल तेव्हा पर्यावरणाचे संवर्धन तर होणारच आहे शिवाय याचा प्रवाशांना देखील मोठा फायदा होईल अशी आशा या निमित्ताने आता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे या गाडीचे ट्रायल रन नेमके कधी होणार आणि व्यावसायिक वापरासाठी ही गाडी कधीपासून सुरू होणार याकडे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचे लक्ष राहणार आहे.