Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वेचा वापर सर्वाधिक केला जातो. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे. यामुळे देशांतर्गत प्रवास करणारे प्रवासी प्रवासासाठी भारतीय रेल्वेचा सर्वाधिक वापर करतात.
रोजाना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दरम्यान रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी मध्य रेल्वेतील प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेतील तब्बल 19 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गाला सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा तसेच या स्थानकाचे ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रेल्वेला हे काम करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे मध्य रेल्वेतील 19 गाड्या वेगवेगळ्या तारखांना रद्द राहणार आहेत.
नऊ ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत वेगवेगळ्या तारखांना या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सक्ती रेल्वेस्थानकाचे पुनर्निर्माण केले जात आहे. तसेच या स्थानकाशी चौथी मार्गिका जोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
यात नागपूर ते बिलासपूर आणि येथून झारसुगुडा या मार्गावर चौथा मार्ग टाकण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून यातील काही विभागांमध्ये काम पूर्ण देखील झाले आहे. अशा परिस्थितीत हे काम करण्यासाठी आणखी 14 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
यामुळे मध्य रेल्वेच्या काही गाड्या 14 दिवसांच्या काळात वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण मध्य रेल्वेवरील कोणत्या गाड्या 14 दिवसांसाठी रद्द राहतील याबाबत रेल्वे प्रशासनाने काय माहिती दिली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या गाड्या राहणार रद्द ?
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,
- 14 ऑगस्टला भुवनेश्वर-कुर्ला एक्सप्रेस
- 16 ऑगस्ट ला कुर्ला भुवनेश्वर एक्सप्रेस
- 12 ऑगस्ट ला संत्रागाछी पुणे एक्सप्रेस
- 14 ऑगस्टला पुणे-संत्रागाछी एक्सप्रेस
- 10 ते 22 ऑगस्ट दरम्यान बिलासपुर रायगड मेमू पॅसेंजर
- 10 ते 22 ऑगस्ट रायगड बिलासपुर मेमू पॅसेंजर
- 9 ते 22 ऑगस्ट बिलासपूर रायगड मेमू पॅसेंजर
- दहा ते 23 ऑगस्ट रायगड बिलासपूर मेमू पॅसेंजर
- 9 ते 21 ऑगस्ट टाटानगर – बिलासपूर एक्सप्रेस
- 10 ते 22 ऑगस्ट बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस
- 9 ते 21 ऑगस्ट टाटानगर – इतवारी एक्सप्रेस
- 9 ते 21 ऑगस्ट इतवारी – टाटानगर – एक्सप्रेस
- 9 ऑगस्ट संत्रागाछी-जबलपूर एक्सप्रेस
- 10 ऑगस्ट जबलपूर-संत्रागाछी एक्सप्रेस
- 10 ऑगस्ट हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेस
- 13 ऑगस्ट रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेस
- 11 ऑगस्ट बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस
- 13 ऑगस्ट पाटणा-बिलासपूर एक्सप्रेस
- 10 ते 22 ऑगस्ट गोंदिया – झारसुगुडा मेमू पॅसेंजर स्पेशल तसेच बिलासपूर आणि झारसुगुडा दरम्यान धावणारी ट्रेन रद्द केली जाणार आहे.