Railway News : भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थानाने नुकतेच चायनाला मागे टाकले आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे देशासमोर काही आव्हाने देखील उभी झाली आहेत.
सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे वाढत्या वाहतुकीसाठी पुरेशी ठरेल अशी पायाभूत सुविधा विकसित करणे. रस्ते, पाणी, वीज, रेल्वे, बस यांसारख्या सुविधा प्रत्येकाला उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हानाचे काम आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारकडून विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवली जात आहे. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत आणखी मजबूत केली जात आहे.
वेगवेगळे लोहमार्ग आणि रस्ते मार्ग तयार केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या वेगवान गाड्या आता भारतीय रेल्वेच्या ताब्यात आल्या आहेत. याशिवाय मेट्रो देखील चालवल्या जात आहेत.
अशातच आता देशाच्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी भारतीय नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की भारतात रेल्वेचे नेटवर्क हे सर्वाधिक लांबीचे नेटवर्क आहे.
भारतात प्रवासासाठी सर्वप्रथम रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा किफायतशीर आहे. तसेच भारतीय रेल्वे ही कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. यामुळे कुठेही जायचे असेल तर रेल्वेने जाता येणे शक्य होते.
मात्र असे असले तरी सध्याच्या लोकसंख्येला भारतीय रेल्वे गाड्यांची संख्या अपुरी पडत आहे. रेल्वे वाहतुकीवर वाढत्या लोकसंख्येचा दबाव आहे. दरम्यान रेल्वे वाहतुकीवरील हाच ताण कमी करण्यासाठी आता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी पुढील पाच वर्षात संपूर्ण देशात तीन हजारांपेक्षा अधिक रेल्वे गाड्या चालवल्या जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे.
खरंतर सध्या एका आर्थिक वर्षात 800 कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे ही प्रवासी संख्या एक हजार कोटी पर्यंत वाढणार आहे. येत्या पाच वर्षात रेल्वेने वार्षिक 1000 कोटी लोक प्रवास करू शकतील अशी व्यवस्था रेल्वेला तयार करायची आहे.
याच पार्श्वभूमीवर पुढील पाच वर्षात तीन हजारांपेक्षा अधिक एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत. यासोबतच रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी देखील रेल्वे कडून प्रयत्न केले जाणार आहेत.
तसेच प्रवासाचे अंतरही कमी व्हावे यासाठी प्रयत्न होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षी पाच हजार किलोमीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकले जात आहेत. तसेच रेल्वे वाहतूक आणखी सक्षम बनवण्यासाठी 1 हजाराहून अधिक उड्डाणपूल आणि अंडरपासही मंजूर झाले असून अनेक ठिकाणी काम सुरू झाले असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही 1,002 उड्डाणपूल आणि अंडरपास बांधले आहेत आणि यावर्षी ही संख्या 1,200 पर्यंत वाढवली जाणार आहे. निश्चितच आगामी काही वर्षात देशातील नागरिकांचा रेल्वे प्रवास आणखी जलद आणि सोपस्कार होणार आहे.
रेल्वे मंत्र्यांनी केलेली ही घोषणा जर नियोजित वेळेत सत्यात उतरली तर याचा मोठा फायदा भारतीय नागरिकांना होणार आहे. यामुळे दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम होईल आणि देशाचा एकात्मिक विकास यानिमित्ताने सुनिश्चित होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.