Rabbi Harbhara Lagwad : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार असून येत्या रब्बी हंगामात हरभरा तसेच गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाणार आहे. गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. दरम्यान जर तुम्ही यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.
कारण की आज आपण हरभऱ्याच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाऊ शकणाऱ्या टॉप 3 हरभऱ्याच्या जातींची आज आपण माहिती पाहणार आहोत.
हरभऱ्याचे सुधारित वाण खालील प्रमाणे
विशाल : हरभऱ्याची ही एक उच्च उत्पादन देणारी जात आहे. टपोरे दाणे असणारी हरभऱ्याची ही जात राज्यात लागवडीसाठी उपयुक्त आहे. या जातीपासून हेक्टरी 35 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा 110 ते 115 दिवस एवढा आहे.
20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात याची लागवड करणे अधिक फायदेशीर आहे. वेळेवर पेरणी केल्यास या जातीपासून अधिकचे उत्पादन मिळत असल्याचे आढळून आले आहे.
विजय : हरभऱ्याची ही जात महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त आहे.
ही एक सर्वोच्च उत्पादन क्षमता असणारी जात असून यापासून शेतकऱ्यांना बागायती भागात 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. विशेष बाब अशी की ही जात कोरडवाहू भागासाठी देखील शिफारशीत आहे. कोरडवाहू भागात लागवड केली तर ही जात 90 दिवसात आणि बागायती भागात लागवड केली तर 105 दिवसात परिपक्व होते.
जॉकी 92-18 : ही देखील हरभऱ्याची एक सुधारित जात आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे. ही जात पेरणी केल्यानंतर 93 ते 120 दिवसात परिपक्व होते. कोरडवाहू भागात लागवड केल्यास लवकर परिपक्व होते आणि बागायती भागात लागवड केल्यास उशिराने परिपक्व होते.
या जातीपासून शेतकऱ्यांना सरासरी 30 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात या जातीची पेरणी केल्यास अधिक चे उत्पादन मिळत असल्याचे आढळून आले आहे. नक्कीच जर तुम्हाला यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड करायची असेल तर या जातीची पेरणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
जेजी-12 : हरभऱ्याची ही जात एकरी 12 ते 14 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. या जातीचे पीक 100 ते 110 दिवसात परिपक्व होते. पीक परिपक्व कालावधीमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाने ही जात विकसित केलेली आहे.