Rabbi Farming : गव्हाच्या पिकातून जर तुम्हालाही हेक्टरी 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. गहू हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. मात्र या पिकातून जर चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक आहे.
यामुळे आज आपण गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण गहू पिकातून 40 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवायचे असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याच्या कोणत्या सुधारित जातींची लागवड करायला हवी या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
तपोवन (एनआयएडब्ल्यू ९१७) : गव्हाचा हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या जातीची बागायती भागात अन वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
हा एक उत्तम सरबती वाण आहे. या जातीच्या गव्हाचे दाणे मध्यम आकाराचे असतात. मात्र या जातीच्या गव्हामध्ये ओंब्यांची संख्या जास्त असते. या गव्हात प्रथिनांचे प्रमाण सुद्धा १२.५ टक्के आढळून आले आहे. ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
खरे तर ही जात उच्च उत्पादनासाठी ओळखले जाते सोबतच या जातीच्या गव्हापासून उत्तम चपात्या तयार होतात. या जातीचे पीक 115 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होते आणि यापासून शेतकऱ्यांना 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर एवढे विक्रमी उत्पादन मिळू शकते.
एनआयएडब्ल्यू : ३४ – गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. बागायती भागात उशिरा पेरणी करण्यासाठी ही एक उत्तम जात असल्याचे आढळून आले आहे. हा गव्हाचा एक सरबती वा नसून या जातीच्या गव्हाचे दाणे मध्यम आणि आकर्षक असतात.
या जातीच्या गव्हाचे पीक 105 ते 110 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होते आणि या जातीपासून हेक्टरी 35 ते 40 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळते असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
त्र्यंबक (एनअयएडब्ल्यू ३०१) : गव्हाची ही देखील एक सुधारित जात असून महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त आहे. या जातीच्या गव्हाचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. या जातीच्या गव्हापासून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी संशोधकांनी केला आहे.
नक्कीच या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळणार असून या जातीची लागवड केल्यासं शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकणार आहे.