Punjab Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे सातत्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देत असतात. हवामानात बदल झाला की लगेच पंजाबरावांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुचित केले जात असते. विशेष बाब अशी की, पंजाबरावांचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
त्यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. पंजाबरावांचे हवामान अंदाज बहुतांशी वेळा अचूक ठरतात असा दावा शेतकऱ्यांकडून केला जातो.
दरम्यान ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी काल अर्थातच 31 जानेवारी 2024 ला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज दिलेला आहे.
यामध्ये त्यांनी आगामी आठवडाभर महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? याबाबत सविस्तर अपडेट दिली आहे.
पंजाबरावांनी पुढील आठवडाभर राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील हवामान कसे राहणार याबाबत पंजाब रावांनी माहिती दिलेली आहे.
कसे राहणार राज्यातील हवामान ?
पश्चिम विदर्भ : येथे आगामी आठ दिवस अर्थातच 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिवसा अंशता ढगाळ हवामान आणि रात्री कडाक्याची थंडी असे काहीसे हवामान येथे पाहायला मिळणार असा दावा पंजाबरावांनी केला आहे.
पूर्व विदर्भ : पश्चिम विदर्भात जसे हवामान राहणार तसेच हवामान पूर्व विदर्भातही राहील. येथे पुढील आठवडाभर हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. दिवसा अंशता ढगाळ हवामान आणि रात्री कडाक्याची थंडी असे हवामान येथे पाहायला मिळू शकते.
मराठवाडा : मराठवाड्यात देखील आगामी आठवडाभर हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. येथे देखील 9 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार नाही.
उत्तर महाराष्ट्र : येथे आगामी आठवडाभर अवकाळी पावसाची शक्यता नाहीये. हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. तथापि दिवसा अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते असा दावा केला जात आहे.
परंतु रात्री चांगली थंडी पडेल असे बोलले जात आहे. खरे तर उत्तर महाराष्ट्रात अर्थातच खानदेश मध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवसा ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. या ढगाळ हवामामुळे तेथील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
आता पंजाबरावांनी आगामी काही दिवस दिवसा अंशता ढगाळ हवामानाची शक्यता व्यक्त केली असल्याने याचा शेतकऱ्यांना पुन्हा मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहे.