Punjab Dakh : येत्या दोन दिवसात मे महिन्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच आता केवळ एक महिना उन्हाळा राहिला आहे. मात्र राज्यात गेल्या महिन्यापासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे.
त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी बांधवांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक या अवकाळी पावसाच्या भक्षस्थानी आले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
दरम्यान आता भारतीय हवामान विभागाने दोन मेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन मेपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा बोरिवलीत; ‘या’ दोन ठिकाणाच अंतर होणार कमी, पहा याचा संपूर्ण रूटमॅप
तसेच मुंबई आणि कोकणात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे मात्र सर्व दूर पाऊस राहणार नाही असं मत व्यक्त होत आहे.
यवतमाळ चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यात अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. अशातच आपल्या हवामान अंदाजासाठी विशेष लोकप्रिय बनलेल्या पंजाब डख यांचा हवामान अंदाज आला आहे.
डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ बायपास झाला खुला, Pune-Nashik प्रवासाचा वेळ वाचणार
मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची शक्यता राहणार असून या कालावधीमध्ये जोरदार वारा देखील वाहणार आहे. विशेष म्हणजे आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा व आजूबाजूच्या जिल्ह्यातही पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार लातूर, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक राहणार आहे.
एकंदरीत डख यांनी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या कामांचे नियोजन करायचे आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी गोड बातमी ! ‘हा’ मेट्रो मार्ग प्रकल्प आता लवकरच होणार पूर्ण; सिडको उभारणार प्रकल्प, शासनाचा हिरवा कंदील