Pune Weather Department : राज्यातील हवामानात येत्या काही दिवसात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून हवामानात होत असलेल्या बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शिवाय उत्पादित झालेल्या मालाला देखील बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहेत.
एकंदरीत पावसाच्या लहरीपणामुळे अन शासनाच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना पावसाचा लहरीपणा सहन करावा लागणार आहे.
पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नऊ ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पाऊस थैमान घालणार असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थातच येत्या तीन दिवसात राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
काय म्हणतंय पुणे वेधशाळा
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय या कालावधीत मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एवढेच नाही तरी या कालावधीत मध्य महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील या कालावधीत पावसाची शक्यता नाकारून चालणार नाही.
परिणामी या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा रब्बी हंगामातील पिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
खरे तर गेल्या खरीप हंगामातही पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा पावसाचा लहरीपणा पाहायला मिळणार आहे.