Pune Water Supply : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, महापालिकेच्या माध्यमातून पुणेकरांसाठी एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आल आहे. या पत्रकाच्या माध्यमातून महापालिकेने पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा 18 एप्रिल 2023 रोजी बंद राहील अशी माहिती दिली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्याच नियोजन करण्यात आलं आहे. हे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या माध्यमातून 18 एप्रिल 2023 रोजी केले जाणार आहे.
अशा परिस्थितीत या दुरुस्तीच्या कामानिमित्त 18 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी पुण्यातील वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे.
म्हणजे हिंगणे, विश्रांतीनगर, सनसिटी रस्ता, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसर या भागात पाणी पुरवठा त्या दिवशी बंद राहणार आहे. साहजिकच या परिसरातील नागरिकांना त्यावेळी पाणी जपून वापरावे लागणार आहे.
हे पण वाचा :- कापूस दरात पुन्हा घसरण! दरवाढीची शक्यता अजूनही कायम आहे का? कापूस 9 हजार पार जाणार का? पहा काय आहे बाजारातील चित्र
दरम्यान दुरुस्तीच्या कामानंतर लगेचच पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. म्हणजेच 19 एप्रिल 2023 पासून या परिसरात देखील नियमितपणे पाणी सोडले जाणार आहे. मात्र 19 तारखेला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दुरुस्तीच्या कामानंतर लगेचच उच्च दाबाने पाणीपुरवठा केल्यास जलवाहिनीच्या म्हणजेच पाईपलाईनच्या कामाला धोका होऊ शकतो यामुळे सावधानता बाळगून 19 एप्रिल ला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती दिली जात आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत सविस्तर अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. एकंदरीत पुणेकरांना, सिंहगड परिसरातील नागरिकांना येत्या मंगळवारी पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो म्हणून पाणी जपून वापरावे लागणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ 31 मार्गांवर सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस; मुंबई, पुणे शहरालाही मिळणार नवीन वंदे भारत ट्रेनची भेट