Pune Vande Bharat Train : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे. भारतीय रेल्वेत नवनवीन तंत्रज्ञानाची एन्ट्री झाली आहे. पाच वर्षांपूर्वी शताब्दी आणि राजधानी याच एक्सप्रेस गाड्या रेल्वेच्या ताफ्यात होत्या, पण आता रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हाय स्पीड ट्रेन देखील दाखल झाली आहे. ही ट्रेन कमाल 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे.
यामुळे प्रवाशांचा प्रवास हा जलद झाला आहे. या ट्रेनचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस ट्रेन च्या तुलनेत थोडेसे अधिक आहेत. मात्र या गाडीमध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सोयी सुविधा आणि या गाडीचा वेग पाहता या गाडीने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जात आहे.
यामुळे फक्त पाच वर्षांच्या काळातच ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2024 ला वंदे भारत स्लीपर ट्रेन चे उद्घाटन होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वंदे भारत स्लीपर रुळावर धावणार आहे.
दरम्यान ही गाडी सुरवातीला देशातील कोणकोणत्या मार्गांवर धावणार याबाबत जाणून घेण्याची प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. अशातच या गाडीच्या रूट संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
ही गाडी काचीगुडा-विशाखापट्टणम, काचीगुडा -तिरुपती, सिकंदराबाद-पुणे या सर्वाधिक व्यस्त मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुणे ते सिकंदराबाद दरम्यान शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे.
पण, या मार्गावर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाऊ शकते अशी शक्यता आहे. अद्याप पुणे रेल्वे स्थानकावरून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्या मार्गे चालवली जात आहे.
याचा पुणेकरांना निश्चितच फायदा झाला आहे. मात्र थेट पुण्यावरून वंदे भारत एक्सप्रेस चालू झाली पाहिजे अशी मागणी आहे. दरम्यान पुण्यावरून वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.
यामुळे पुणेकरांची वंदे भारत ट्रेनची मागणी पूर्ण होणार आहे. रेल्वे अधिकारी या व्यस्त मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्यासाठी आग्रही आहेत. या गाडीला एकूण 16 डबे राहणार आहेत. ही गाडी रात्रीच्या कालावधीतही धावणार आहे.
या गाडीमध्ये एसी आणि नॉन एसी स्लीपर कोच राहणार आहेत. या गाडीचा वेग 160 किलोमीटर प्रति तास एवढा राहील, असे बोलले जात आहे. तसेच याचे तिकीट दर हे सर्वसामान्यांना सुद्धा परवडतील अशा पद्धतीचे राहणार आहेत.